पूजा भट्टच्या फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर,प्रत्येक स्टाइलमध्ये दिसायची खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 07:08 PM2020-08-21T19:08:05+5:302020-08-21T19:17:33+5:30

बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली पहायला मिळते. तिच्या सिनेमांसोबतच ती तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते.

प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक महेश भट्ट यांची पूजा भट्ट मुलगी अशी तिची ओळख असली तरी एक अभिनेत्री म्हणूनही तिने तिचे प्रस्थ निर्माण केले होते.

यश माणसाला हुरळून टाकतं... यशशिखरावर असताना कशाचंही भान राहत नाही अशीच काहीशी अवस्था पूजा भट्टची झाली होती.

काही दिवसांपूर्वीच पूजा भट्टने बाथटब फोटो शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते.

तिच्या या फोटोंवर लाईक्स कमीच नेटीझन्सचा संतापच जास्त झाल्याचे पाहायला मिळाले होते.

करिअरच्या सुरूवातीच्या काळात पूजा भट्टही सुपरहिट अभिनेत्रींपेकी एक मानली जायची.

तिचे घायाळ करणारे सौंदर्य पाहून तिने आपल्या सिनेमात काम करावे अशी निर्मांत्याची इच्छा असायची.

सोशल मीडियावर पूजा भट्टचे जुने फोटो पाहून तुम्हालाही तिच्या नॅचरल ब्युटीचा अंदाज येईल.

कॉलेजमध्ये असताना महेश भट्ट यांनी वयाच्या विसाव्या वर्षी लोरिएन ब्राईट नावाच्या तरुणीशी लग्न केलं होतं.

लग्नानंतर महेश भट्ट यांनी लोरिएनचं नाव किरण भट्ट असं केलं.

महेश आणि किरण यांची दोन मुलं आहेत. एक पूजा भट्ट आणि दुसरा राहुल भट्ट.