श्रिया पिळगावकर लेटेस्ट फोटोशूटमध्ये दिसली ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 06:00 AM2021-03-15T06:00:00+5:302021-03-15T06:00:00+5:30

श्रिया पिळगावकरच्या फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.

श्रिया पिळगावकरने नुकतेच एथनिक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटसाठी खुद्द तिनेच मेकअप केला आहे आणि याबद्दल तिने फोटो शेअर करत सांगितले आहे.

श्रियाच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

श्रिया पिळगावकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

श्रियाचा आगामी त्रिभाषिक सिनेमा हाथी मेरे साथीचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

या चित्रपटात श्रियासोबत राणा दुग्गाबती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.