'द फॅमिली मॅन' फेम प्रिया मणी राजचे ग्लॅमरस फोटो आले चर्चेत, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 06:36 PM2021-06-09T18:36:23+5:302021-06-09T18:45:39+5:30

प्रिया मणी राजचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

द फॅमिली मॅन या वेबसीरिजमधून अभिनेत्री प्रिया मणी राज घराघरात पोहचली आहे.

प्रिया मणी राज सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

प्रिया मणी राज बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते. तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो.

प्रियामणी विद्या बालनची चुलत बहिण आहे.

प्रियामणी साऊथच्या बड्या स्टार्सपैकी एक आहे. तिच्या बोल्डनेससाठी ती ओळखली जाते.

प्रियामणिचे पूर्ण नाव प्रिया वासुदेव अय्यर आहे. शाळेच्या दिवसांतच तिने कांचीवरम सिल्क आणि इरोड सिल्कसाठी मॉडेलिंग केली होती.

12 वीत असतानाच तामिळ दिग्दर्शक भारतीराजा यांनी तिला चित्रपटसृष्टीत लॉन्च केले होते. यानंतर प्रियामणिने कधीच मागे वळून बघितले नाही.

शाहरूख खानचा चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’ यातील ‘वन टू थ्री फोर’ या गाण्यात प्रियामणिने कॅमिओ केला होता.

मणिरत्नम यांच्या ‘रावण’ या सिनेमात ती अभिषेक बच्चनसोबत दिसली होती.