'Black' movie मध्ये रानी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका साकारणारी चिमुकली दिसते ग्लॅमरस; पाहा Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 04:31 PM2021-10-11T16:31:02+5:302021-10-11T16:42:16+5:30

Black या चित्रपटात Bollywood Movie आयशा कपूरनं Ayesha Kapur रानी मुखर्जीच्या Rani Mukherjee च्या बालपणीची भूमिका साकारली होती.

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचं चित्रपट क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. अनेक भव्य दिव्य गोष्टींना त्यांचं प्राधान्य असतं. २००५ मध्ये त्यांनी ब्लॅक या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रानी मुखर्जी यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटात रानी मुखर्जीच्या लहानपणीची भूमिका साकारणाऱ्या मुलीच्या भूमिकेचंही कौतुक करण्यात आलं होतं.

आयशानं आपल्या अभिनयानं सर्वांच्याच हृदयावर छाप सोडली होती. आयशानं जेव्हा ती भूमिका साकारली होती तेव्हाती अवघ्या ११ वर्षांची होती. त्यावेळी तिला बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा अवॉर्डही मिळाला होता. आता पुन्हा एकदा ती चित्रपटांमध्ये झळकण्यासाठी तयार आहे. पाहूया ती सध्या काय करते.

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचं चित्रपट क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. अनेक भव्य दिव्य गोष्टींना त्यांचं प्राधान्य असतं. २००५ मध्ये त्यांनी ब्लॅक या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रानी मुखर्जी यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटात रानी मुखर्जीच्या लहानपणीची भूमिका साकारणाऱ्या मुलीच्या भूमिकेचंही कौतुक करण्यात आलं होतं.

आयशाने कोलंबिया विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आहे. आयेशाची आई जर्मन नागरिक आहे आणि तिचे वडील एक प्रसिद्ध व्यापारी आहेत. आयेशाला तीन भाऊ आहेत. आयशाचे वडील लेदर बँग्सचा इंटरनॅशनल ब्रँड हायडिझाईन हा चालवतात. तो या साखळीचा मालक आहे. ब्लॅक चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी आयशा सोबत आलिया भट्टनंही ऑडिशन दिलं होतं. परंतु यामध्ये आयशाची निवड करण्यात आली.

यापूर्वी आयशा २००९ मध्ये सिकंदर या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती या इंडस्ट्रीमधून गायब झाली. यानंतर शेखर कपूर यांनी पानी या चित्रपटासाठी तिची निवड केली होती. या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतच्या अपोझिट दिसणार होती.

आयशा एक बिझनेस वूमन असण्यासोबत एक लेखकही आहे. ती ब्लॉगही लिहित असते. तिचे फॉलोवर्सही मोठ्या प्रमाणात आहे. तसंच सध्या ती आपल्या आईसोबत एका ज्वेलसी ब्रँडसोबत जोडलेली आहे. ती सध्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे.

ती अनेकदा आपले फोटोस सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या आयशा कपूर अदम ओबेरॉय याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. अनेकदा ती दोघांचेही फोटो शेअर करताना दिसते.