शाहरुखचा मोठा निर्णय! रवी सिंहच्या जागी नेमणार नवा बॉडीगार्ड?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 11:23 AM2021-11-12T11:23:29+5:302021-11-12T11:30:22+5:30

Shahrukh khan : शाहरुखच्या अडचणीच्या प्रसंगी रवी सिंह किंग खानची सावली बनून राहत होता. परंतु, आता आर्यनची सुटका झाल्यानंतर शाहरुखने रवी सिंहविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (shahrukh khan) लेक आर्यन खान (aryan khan) याला ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी एनसीबीने (NCB) ३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. त्यानंतर जवळपास महिन्याभरातनंतर २९ ऑक्टोबर रोजी आर्यनची जामीनावर सुटका झाली.

सध्या आर्यनची जामीनावर सुटका झाली असून तो घराबाहेर पडण्याचं कटाक्षाने टाळत आहे. यातच गेल्या काही दिवसांमध्ये घडून गेलेल्या घटनांमुळे शाहरुख अजूनही काळजीत आहे.

शाहरुखच्या संकट काळात त्याच्या बॉडीगार्डने रवी सिंहने किंग खानची कुटुंबाप्रमाणेच साथ दिली होती.

शाहरुखच्या अडचणीच्या प्रसंगी रवी सिंह किंग खानची सावली बनून राहत होता. परंतु, आता आर्यनची सुटका झाल्यानंतर शाहरुखने रवी सिंहविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे.

महिन्या भराच्या ब्रेकनंतर शाहरुख त्याच्या कामावर रुजू होणार आहे. परंतु, यावेळी तो त्याचा बॉडीगार्ड म्हणून एका नव्या अंगरक्षकाची नेमणूक करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

शाहरुख यापुढे रवी सिंहऐवजी एक नवीन बॉडीगार्ड नेमणार आहे. त्यामुळे शाहरुखने असा अचानकपणे निर्णय का घेतला हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

रवी सिंह गेल्या कित्येक वर्षांपासून शाहरुखच्या बॉडीगार्डचं काम करत आहे. केवळ शाहरुखच नव्हे तर सुहाना, आर्यन, अबराम आणि गौरी यांच्यासोबतही तो बॉडीगार्ड म्हणून वावरला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या शाहरुखला सतत आर्यनची चिंता सतावत असल्यामुळे तो रवी सिंहला आता आर्यनचा बॉडीगार्ड म्हणून नेमणार आहे. आर्यन कोणत्याही व्यक्तीसोबत पटकन मैत्री करत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी नवा बॉडीगार्ड नेमण्यापेक्षा यापुढे रवी सिंह आर्यनसोबत राहणार आहे.

यापुढे रवी सिंह आर्यनसोबत राहणार असल्यामुळे शाहरुख स्वत:साठी नवा बॉडीगार्ड नेमणार आहे.

आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागते. यावेळी रवी सिंह आर्यनसोबत जाणार आहे. तसंच शाहरुख येत्या काळात आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी विदेश दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे आर्यनच्या सुरक्षेची जबाबदारी त्याने रवी सिंहवर सोपवली आहे.