विकी कौशलसोबतच्या रिलेशनशीपवर कतरिना कैफने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 12:18 PM2021-06-23T12:18:10+5:302021-06-23T12:23:48+5:30

विविध सिनेमात कतरिना कैफने वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. कतरिना सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.

सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते.

सध्या कतरिना तिच्या सिनेमांमुळे नाहीतर वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

अभिनेता विकी कौशलसह अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

कतरिना विकी कौशलसह रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे.

कतरिना जिथे जाते तिथे तिला विकी कौशलबद्दल विचारले जाते.

एका कार्यक्रमात कतरिनाला तिच्या अफेअरवर प्रश्न विचारले गेले.

यावेळी मीडियाला उत्तर देण्यात फारशी उत्सुक दिसली नाही.

याउलट हसहसत तिने मीडियाला उत्तर देणं टाळलं.

तिच्या अफेअरच्या रंगणा-या चर्चांमुळे कतरिनाही बरीच वैतागली आहे.

माझे कोणासोबत अफेअर सुरु आहे यापेक्षा मला माझे करिअर जास्त महत्त्वाचे आहे असे म्हणत अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.