शाहरूख खानची वेबसीरिज बेतालचा फर्स्ट लूक झाला रिलीज, या तारखेला येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 07:21 PM2020-05-06T19:21:58+5:302020-05-06T19:21:58+5:30

किंग खान शाहरूखचे प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एण्टरटेन्मेंट बॅनर अंतर्गत वेबसीरिज बेतालचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झाला आहे.

शाहरूख खानची वेबसीरिज नेटफ्लिक्सवर पहायला मिळणार आहे. या सीरिजचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर किंग खानने शेअर केला आहे.

या सीरिजचे दिग्दर्शन पैट्रिक ग्राहमने केले आहे.

पैट्रिक ग्राहमने यापूर्वी नेटफ्लिक्सवरील राधिका आपटेची हॉरर थ्रिलर मिनी सीरिज घुलचे दिग्दर्शन केले आहे.

या वेबसीरिजमध्ये अभिनेता विनीत कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.