फातिमाचं बोल्ड फोटोशूट, आमिरची लेक इरा खानही पडली या सुंदर फोटोंच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 06:19 PM2021-07-19T18:19:13+5:302021-07-19T18:29:42+5:30

आमिर खान किरण राव यांचा घटस्फोट झाल्यापासून अभिनेत्री फातिमा सना शेख प्रचंड चर्चेत आहे. तिच्यासाठीच आमिरने किरणला घटस्फोट दिला अशी चर्चा आहे.

आमिर खान किरण राव यांचा घटस्फोट झाल्यापासून अभिनेत्री फातिमा सना शेख प्रचंड चर्चेत आहे. तिच्यासाठीच आमिरने किरणला घटस्फोट दिला अशी चर्चा आहे.

आमिर व किरणच्या घटस्फोटामुळे फातिमा ट्रोलही होतेय. या ट्रोलर्सला फातिमाने आपल्या बोल्ड फोटोशूटद्वारे एकप्रकारे उत्तर दिले आहे.

निळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची जिन्समध्ये फातिमाने एकापेक्षा एक बोल्ड पोज दिल्या आहेत.

फातिमाच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. यात आमिरची मुलगी इरा खान हिची कमेंटही लक्ष वेधून घेत आहे.

यु ब्युटी, अशी कमेट इरा खानने या फोटोवर केली आहे. अर्थात काही नेटकऱ्यांनी फातिमाला ट्रोलही केले आहे.

आमिरचे पूर्ण लक्ष हे तुझ्यावर आहे, सगळे गेट हे फक्त आमिरसाठी खुले आहेत, अशा शब्दांत अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

पण ट्रोलर्सची पर्वा करणारी फातिमा नाहीच. या कमेंट्चा तिच्यावर काहीही फरक पडत नाही.

फातिमा सना शेखने बालकलाकार म्हणून आपल्या करियरची सुरूवात ‘इश्क’ चित्रपटातून केली होती. त्यानंतर चाची ४२०, बडे दिलवाले, वन टू का फोर, बिट्टो बॉस व आकाशवाणीमध्ये झळकली आहे.