अनेक वर्षांनी हा अभिनेता करणार अभिनयसृष्टीत कमबॅक, कमी केले कित्येक किलो वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 06:37 PM2021-03-22T18:37:15+5:302021-03-22T18:48:17+5:30

फरदीन खानने त्याचे कित्येक किलो वजन कमी केले असून त्याचा नवीन लूक नुकताच पाहायला मिळाला.

सेलिब्रेटी हेअर स्टायलिस्ट आलीम हाकीमच्या सलून बाहेर फरदीनला नव्या लूकमध्ये पाहायला मिळाले.

आलीमने देखील त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता फरदीन खान गेल्या अनेक वर्षांपासून ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर आहे. 2016 नंतर फरदीन बॉलिवूडमधून जणू गायब झाला. काही वर्षांपूर्वी फरदीनचे वजन खूप वाढले होते. वयापेक्षा तो अधिक म्हातारा दिसू लागला होता. यावरून लोकांनी त्याला ट्रोलही केले होते.

1998 साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाद्वारे फरदीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. फरदीनच्या वडिलांनी म्हणजे फिरोज खान यांनीच हा चित्रपट प्रोड्यूस केला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. अगदी पदार्पणालाच फरदीनच्या वाट्याला फ्लॉप सिनेमा आला. यानंतर यशाची चव चाखायला त्याला 2000 सालची वाट पाहावी लागली. 2000 साली रिलीज झालेल्या ‘जंगल’ या सिनेमाने फरदीनला ओळख दिली. त्याने आता त्याचे कित्येक किलो वजन कमी केले असून तो लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.