वयाच्या ४२ व्या वर्षीही अजय देवगणच्या मेहुणीच्या हॉट बिकीनीत मादक अदा, तुम्हालाही करतील फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 02:57 PM2021-01-18T14:57:32+5:302021-01-18T15:07:32+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगणची मेहुणी म्हणजेच अभिनेत्री तनिषा मुखर्जी. रुपेरी पडद्यावर अपयशी ठरलेल्या तनिषाकडे सध्या कोणतेही चित्रपट नाहीत. मध्यंतरी ती बिग बॉसमध्ये झळकली होती. मात्र तिच्याकडे कोणताही प्रोजेक्ट नाही. असं असलं तरी सध्या तनिषाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

तनिषाने पोस्ट केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. बिकीनी फोटोमुळे तनिषा मुखर्जी नेटकऱ्यांना घायाळ करत आहे.

निसर्गरम्य बेटावर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या ठिकाणी तनिषाचे बिकीनी फोटो तुम्हाला क्लीन बोल्ड करतील.

काजोलची बहीण असलेल्या तनिषाने शूssss या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.

यानंतर 'नील एंड निक्की', 'सरकार राज', 'वन टू थ्री', 'टैंगो चार्ली' सिनेमात ती झळकली. मात्र हे सगळे सिनेमे तिकीटखिडकीवर आपटले.

यानंतर 'बिग बॉस शो'मध्ये तिच्या आणि अरमान मलिकच्या कथित रिलेशनशिपच्या चर्चा ऐकायला मिळाल्या.

मात्र अरमान आपला चांगला मित्र असल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न तनिषाने केला होता.

वयाच्या 4२ वर्षांनंतरही तनिषा अविवाहित आहे.

मध्यंतरी तनिषाला तिचे बोल्ड फोटो शेअर करणे तिच्या अंगाशी आले होते, ती ट्रोलिंगला बळी पडली होती.

चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तिने केलेला हा प्रयत्न चक्क फसला होता.

चाहत्यांनी नको नको त्या कमेंट करत फोटोंवर नापसंती दर्शवली होती.

या लूकसाठी तनीषाने पुष्कळ मेहनत घेतली असले पण युजर्सने अशा कमेंट्स करुन सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवले होते.