एली अवरामने खास अंदाजात शेअर केला चहा पितानाचा फोटो, फॅन्स म्हणाले अशाने थंडी वाजेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 11:47 PM2022-01-19T23:47:58+5:302022-01-19T23:51:19+5:30

Elli AvrRam Latest Photos:

एली अवराम ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच धमाकेदार नृत्याविष्काराच्या जोरावर तिने प्रेक्षकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. दरम्यान, इन्स्टाग्रामवर तिचे तब्बल ४२ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

एली अवराम नियमितपणे आपले लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा एली अवराम हिने आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

एली अवरामने हे फोटो शेअर करताचक्षणी इंटरनेटवर या फोटोंची चर्चा सुरू झाली आहे. या फोटोंमध्ये ती खूप बोल्ड दिसत आहे.

एली अवराम या फोटोंमध्ये ब्रालेट आणि जिन्समध्ये दिसत आहे. त्यामध्ये तिची बोल्डनेस अधोरेखित होत आहे.

फोटोमध्ये एली अवराम किचनमध्ये चहा पिताना दिसत आहे. ब्रालेटमध्ये तिला चहा पिताना पाहून फॅन्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. थंडी वाजेल, असे फॅन्स तिला म्हणत आहेत.

एली अवरामच्या या फोटोंना चाहते खूप लाईक करत आहेत. तसेच त्यावर मोठ्या प्रमाणावर कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिक्रियाही देत आहेत.

हल्लीच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एली अवरामच्या या फोटोंना मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळाल्या आहेत.

मात्र एलीने असे फोटो शेअर केले आहेत असे नाही, यापूर्वीही तिने आपले अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ते सोशल मीडियावर व्हायरल होत आले आहेत.