UP Election 2022: कोण आहे बिकिनी गर्ल अर्चना गौतम? तिला UPमध्ये काँग्रेसनं दिलंय तिकीट, ग्रेट ग्रँड मस्तीमध्ये केलं होतं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 09:44 PM2022-01-13T21:44:18+5:302022-01-13T21:49:18+5:30

Uttar Pradesh Assembly Election 2022 Updates: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी Congressने अभिनेत्री Archana Gautam हिचेही नाव आहे. तिला मेरठमधील हस्तिनापूरमधून तिकीट देण्यात आले आहे. ही अर्चना गौतम कोण आहे, हे आज आपण जाणून घेऊया.

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. तिकिट वाटपात महिलांना प्राधान्य देण्याची घोषणा करणाऱ्या प्रियंका गांधी यांनी आज १२५ उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये ४० टक्के महिलांना तिकीट दिले आहे. यामध्ये अभिनेत्री अर्चना गौतम हिचेही नाव आहे. तिला मेरठमधील हस्तिनापूरमधून तिकीट देण्यात आले आहे. ही अर्चना गौतम कोण आहे, हे आज आपण जाणून घेऊया.

अर्चना गौतम अभिनेत्री, मॉडेल आणि ब्युटी पेजेंट विजेता आहे. अर्चना गौतम ही २०१४ मध्ये मिस उत्तर प्रदेश बनली होती. त्यानंतर ती मिस बिकिनी इंडिया आणि मिस बिकिनी युनिव्हर्स इंडिया बनली होती. तिने मिस कॉसमॉस वर्ल्ड २०१८ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

अचर्ना गौतम हिने मेरठमधील आयआयएमटीमधून बीजेएमसी विषयात पदवी घेतली होती. तिने मोस्ट टॅलेंट २०१८चे उपविजेतेपदही पटकावले होते. अर्चना गौतम हिने २०१५ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत तिला बिकिनी गर्ल म्हणून ओळखले जाते.

मलेशियामध्ये मिस टॅलेंट २०१८ चे विजेतेपद पटकावत अर्चना गौतमने अजून एक यश मिळवले होते. ब्युटी पेजेंट जिंकल्यापासून अर्चना गौतम मॉडेलिंगच्या जगात कार्यरत आहेत. तसेच ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली आहे.

अर्चना गौतम हिने विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती श्रद्धा कपूरच्या हसिना पारकर आणि बारात कंपनी या चित्रपटात दिसली होती.

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या जंक्शन वाराणसी चित्रपटामध्ये अर्चना गौतम हिने एक आयटम नंबर केला होता. त्याशिवाय तिने टी-सीरिजच्या म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले होते. त्याशिवाय तिने पंजाबी आणि हरियाणवी गाण्यांच्या म्युझिक व्हिडीओमध्येही ती दिसली होती.

बॉलिवूडमध्ये नशीब आजमावल्यानंतर अर्चना गौतम ही दक्षिणेतील चित्रपटांचा भाग बनण्यासाठी सज्ज झाली आहे. ती IPL it’s Pure Love या तेलुगू आणि Gundas आणि 47A या तामिळ चित्रपटांमध्ये काम करत आहे.

अर्चना गौतम हिला २०१८ मध्ये Dr. S. Radhakrishnan Memorial Awards ने सन्मानित करण्यात आले होते. तर २०१८ मध्येच तिला  Women Achiever Award by GRT पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता राजकारणाच्या आखाड्यात ती चमक दाखवते की नाही, हे पाहावे लागेल.