SEE PICS : एकता कपूरच्या घरी रंगली प्री-दिवाली पार्टी, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 11:37 AM2020-11-13T11:37:38+5:302020-11-13T11:47:14+5:30

यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट असले तरी उत्साह कायम आहे. बी-टाऊनमध्ये दिवाळी पार्ट्यांना सुरुवात झाली. सर्वात आधी टेलिव्हिजनची क्वीन एकता कपूर हिच्या घरी प्री-दिवाली पार्टी रंगली.

काल रात्री एकता कपूरच्या घरी ग्रँड प्री-दिवाली पार्टी झाली. या पार्टीला मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

ग्लॅम डॉल मौनी रॉय हिने अशा स्टाइलिश अंदाजात पार्टीची शान वाढवली.

मौनी एकता कपूरच्या या पार्टीत सेंटर ऑफ अटेंशन होती.

अभिनेत्री हिना खान हिने एकताच्या दिवाळी पार्टीत चार चाँद लावलेत.

सुपर 30 या सिनेमात दिसलेली मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर ही सुद्धा डबल शेड साडीत एकता कपूरच्या पार्टीत सहभागी झाली.

करिश्मा तन्ना अशा स्टाईलमध्ये एकताच्या पार्टीला पोहोचली.

टीव्ही स्टार अनिता हसनंदानी आपल्या पतीसोबत दिसली. यावेळी अनिता तिचे बेबी बम्प लपवताना दिसली. अनिता लवकरच आई होणार आहे.

फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा, अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा असे सगळे पार्टीत सहभागी झालेत.

उर्वशी ढोलकिया हिने पार्टीचा आनंद लुटला.

करण पटेल व त्याची पत्नी भार्गवी हेही पार्टीला हजर होते.

Read in English