दारूच्या नशेत धुंद होत सारा अली खान मित्रांसोबत अशी करते एन्जॉय, जुने फोटो पुन्हा होतायेत व्हायरल

By सुवर्णा जैन | Published: September 22, 2020 04:29 PM2020-09-22T16:29:44+5:302020-09-22T16:42:34+5:30

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर या प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आले आहे. एनसीबीकडून सुरू असणाऱ्या या प्रकरणातील तपासामध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावे समोर आल्याने चाहत्यांनाही धक्का बसला आहे. आता या तपासाला एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

छोटे नवाब सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची लेक सारा अली खानने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताच सतत चर्चेत राहिली.

केदारनाथ सिनेमातून रुपेरी पडद्यावर झळकण्याआधीच साराने आपल्या स्टाइल आणि फॅशनने साऱ्यांची मने जिंकली.

केदारानाथ सिनेमानंतर सुशांतने ड्रग्सचा डोस वाढवला. रियाच्या म्हणण्यानुसार सारा अली खानसोबत सुशांतने पहिल्यांदा घेतला होता ड्रग्सचा हेवी डोस

सारा आणि सुशांतसिंग राजपूत 'केदारनाथ' चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी ड्रग्सचा नशा करायचे. हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये सिनेमाचे शूटिंग होत असल्यामुळे तेथून ड्रग्सचा मिळवणे सहज शक्य व्हायचे.

त्यादरम्यान सारा आणि सुशांतचे वजनही त्या दिवसांत ड्रग्समुळे वाढले होते. बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनमध्ये अभिनेत्री सारा अली खानचेही नाव समोर आले आहे.

बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणात साराचे नाव समोर आल्यापासून इंटरनेटवर साराचे जुने पार्टीमध्ये धमाल करतानाचे फोटोही व्हायरल होत आहेत.

रात्री क्लबमध्ये होणा-या पार्ट्यांमध्ये सारा मित्रांसह दारूच्या नशेतही धुंद झाल्याचे पाहायला मिळते आहे.

पार्टीमध्ये सारा अली खान बड्या कालाकांराचीही मुलं दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने दिलेल्या पार्टीमध्ये दारूच्या नशेत सगळे फुल ऑन धुमाकुळ घालत असल्याचे फोटोही पुन्हा व्हायरल झाले आहेत.