See Pics : कंगना राणौतचे ‘स्वप्न’ भंगले, मुंबई पालिकेने पाडले ऑफिस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 12:43 PM2020-09-09T12:43:50+5:302020-09-09T13:02:01+5:30

कंगनाला पंगा पडला महाग...

मुंबईची पीओकेशी तुलना करणे कंगना राणौतला भोवले. आज मुंबई महानगरपालिकेने कंगनाला जोरदार दणका देत, तिच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत कारवाई केली.

मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयाबाहेर काल नोटीस लावली होती. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आले असून, रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले होते.

अधिनियम ३५४ अ अंतर्गत नोटीस लावण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई केली गेली.

या कारवाईनंतर कंगनाने प्रचंड संताप व्यक्त केला. मी जे बोलले ते अगदी बरोबर आहे. मुंबई ही पाकव्याप्त भाग आहे़, हे पालिकेच्या कारवाईवरून सिद्ध झाले आहे, असे ती म्हणाली.

पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचे फोटो कंगनाने ट्विट केले असून बाबरची सेना, पाकिस्तान, पाकिस्तानव्याप्त काश्मीर असे उल्लेख करण्यात आले आहेत. ही लोकशाहीची हत्या असल्याचे तिने म्हटले आहे.

पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेतली असून दुपारी सुनावणी होणार आहे.

आज सकाळी पालिकेचे कर्मचारी कंगनाच्या कार्यालयात धडकले. यानंतर कारवाई सुरु झाली.

यावेळी येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कंगनाच्या या कार्यालयाची किंमत तब्बल 48 कोटींपेक्षा जास्त होती.

जानेवारीत या कार्यालयाने उद्घाटन झाले होते.

मुंबईच्या पाली हिल परिसरात हे कार्यालय असून त्याचे नाव मणिकर्णिका फिल्म्स ठेवण्यात आले होते.