बॉलिवूडमधील टॉप सेलिब्रिटींची खरी नावे तुम्हाला माहीत आहेत का? नसतील तर आता जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:53 PM2020-01-08T13:53:13+5:302020-01-08T17:30:49+5:30

आपले पाळण्यात ठेवलेले नाव हे शेवटपर्यंत तसेच राहते पण हे बॉलिवुड मधील अभिनेते सुपरहिट होण्यासाठी आपले नाव बदलताना दिसतात.सलमान खान, अक्षय कुमार, प्रीती झिंटा आणि नामांकित कलाकार यांची ही नावे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

बॉलिवूडच्या भाईजानने आपले नाव बदलून अब्दुल रशीद सलीम खानपासून सलमान खान असे ठेवले. सलमान खान हा पटकथा लेखक सलीम खान आणि त्याची पहिली पत्नी यांचा हा मोठा मुलगा आहे.

कॅटरिना कैफ बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मानली जाते , तिची मूळ नाव कॅटरिना नसून कतरिना टर्क्कोटी असे आहे

बॉलिवुड गाजवणारे आणि वृद्धपणातही अनेक चित्रपट करणारे हे महानायक आतापर्यंत सर्वांच्या दिलावर राज्य करत आहे. यांनी आपले नाव इंकलाब श्रीवास्तव हे बदलून अमिताभ बच्चन हे ठेवले आहे.

रेखा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अतिशय मोहक आणि प्रसिध्द अभिनेत्री आहे. यांनी आपले नाव भानुरेखा गणेशन हे बदलून रेखा ठेवले आहे

टायगर श्रॉफ हा बॉलिवुड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. उत्कृष्ट बॉडी असणारा हा अभिनेता कितीतरी मुलींच्या हृदयात घर करून बसला आहे. या अभिनेत्याचे खरे नाव हेमंत श्रॉफ हे आहे .

इंडस्ट्रीत येण्याचा आधी अक्षय कुमार याचे खरे नाव राजीव भाटिया होते . बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी कलाकारांपैकी एक म्हणून तो जगभरात अक्षय कुमार म्हणून ओळखला जातो.

शिल्पा शेट्टी हिने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधी काही वर्षांपूर्वीच तिचे नाव बदलले होते . तिचे खरे नाव अश्विनी शेट्टी होते शिल्पाने तिच्या आईच्या सांगण्यावरून तिचे नाव बदलले

गोविंदा हा त्याच्या काळी सुपरहिट हिरो मानला जायचा . खूप सारे हिट सिनेमे देऊन त्याने लोकांच्या मनावर राज्य केले आहे. याचे खरे नाव आहे ते अरुण आहुजा.

रजनीकांत यांचा जन्म तत्कालीन बंगळुरूमध्ये स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबात झाला. रजनीकांत जिजाबाई आणि रामोजीराव गायकवाड यांचे चौथे अपत्य होते आणि त्याचे नाव मराठा योद्धा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून शिवाजीराव गायकवाड हे ठेवण्यात आले होते

बी-टाऊनचा सिंघम, अजय देवगण यांचे मूळ नाव विशाल देवगन होते. एक हुशार अभिनेत्याव्यतिरिक्त ते दिग्दर्शक आणि चित्रपटाचे निर्माता देखील आहेत. त्याला बॉलीवूड मधील सर्वात अष्टपैलू आणि महत्त्वपूर्ण कलाकारांपैकी एक म्हणून मानले जाते.

प्रीती झिंटाचे खरे नाव प्रीतम झिंटा सिंग होते. बॉलिवूडची निवड केल्यानंतर तिने आपले नाव बदलण्याचे ठरविले आणि प्रीती झिंटा म्हणून ती प्रसिद्ध झाली. बॉलिवूडमध्ये न राहता ती उद्योजक आहे.

जॉनी लिव्हर याने आजपर्यंत आपल्या सिनेमातून सर्व प्रेक्षकांना हसवून सोडले आहे. जॉनी लिव्हर म्हणजेच कॉमेडीचा बादशहा. त्याचे कोणत्याही सिनेमात असणे म्हणजे आपल्यासाठी हास्याची मैफिल असते. पण त्याचे खरे नाव जॉनराव प्रकाश राव जनुमाला.

बॉलीवूड मधील हा ऍक्शन हिरो दिसायला अत्यंत हँडसम, बॉडी बिल्डर. धूम सिनेमातून पदार्पण केल्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याचे वडील हे सिंधी तर आई पारशी समाजाची होती. त्यामुळे त्यांनी जॉन अब्राहमचे नाव फरहान अब्राहम हे पारशी नाव ठेवले होते.

आपल्या काळात आपल्या डिस्को डान्सने सर्व प्रेक्षकांना हेरून धरणारा हा अभिनेता मिथुन हयांनी शून्यातून आपले जग निर्माण केले आहे . खूप मेहनत घेऊन आज या ठिकाणी त्यांनी आपले स्थान निश्चित केले आहे. यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती असे होते.