सलमानच्या या हिरोईनला तुम्ही ओळखता? कॅटरिना कैफसोबतच्या तुलनेमुळे उद्धवस्त झाले अभिनेत्रीचे करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 07:15 PM2021-02-26T19:15:21+5:302021-02-26T19:19:49+5:30

लोकांनी मला 'फॅटरिना' म्हटले. जेव्हा मी एखाद्या कार्यक्रमाला जायचे तेव्हा माझ्याबद्दल काहीही चांगले लिहिले जात नव्हते. कतरिनासारखी दिसत असल्याचे सांगून माझी पब्लिसिटी केली जायची.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानने बॉलिवूडमध्ये लाँच केले होते.

कॅटरिना कैफसारखी जरीन दिसते म्हणून जरीनला ‘वीर’ सिनेमा मिळाला होता.

झरीनने 'वीर' या सिनेमानंतर 'हाऊसफुल २', 'हेट स्टोरी ३', 'अक्सर २' या सिनेमांमध्येही काम केले.

पण झरीनला बॉलिवूडमध्ये पाहिजे तसे यश मिळाले नाही.

बॉलीवुडमध्ये पाऊल ठेवल्यानंतर तिची गणना आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जात होती.

तिला कतरिना कैफची डुप्लिकेट म्हणून ओळखले जायचे.

करिअरच्या सुरुवातीलाच कॅटरिनाची लुक अ लाइक म्हणून झरिन प्रकाशझोतात आली होती.

वारंवार कॅटरिनासह तुलना केली जात होती. यावर अनेकदा नाराजी व्यक्त केली होती.

दिलेल्या मुलाखतीत तिने यावर आपले मत मांडताना सांगितले होते की, लोकांना मला पाहण्याची संधी मिळाली नाही.

माझ्याविषयी आधीच मत तयार केले गेले. मी त्यांच्यासाठी केवळ गॉसिपचा विषय ठरले होते.