सुहाना, सारा, जान्हवी ते आर्यन या बॉलिवूडच्या स्टारकिड्सचे शिक्षण माहित आहे का?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 02:06 PM2021-03-27T14:06:05+5:302021-03-27T14:22:51+5:30

जाणून घेऊयात या स्टारकिड्सच्या शिक्षणाबद्दल...

जान्हवी कपूर - दिग्दर्शक बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवीने 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जान्हवीने मुंबईतील धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जान्हवीने अमेरिकेतील ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे धडे गिरविले आहेत.

सारा अली खान - अभिनेता सारा अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी साराने कोलम्बिया विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.

इब्राहिम अली खान- इब्राहिम अली खान हा अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंगचा मुलगा आहे. इब्राहिम अली खानने मुंबईतील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यापुढचे शिक्षण तो इंग्लंडमध्ये घेतो आहे.

सुहाना खान - अभिनेता शाहरूख खान आणि गौरी खानची मुलगी सुहानाने तिचे शालेय शिक्षण हे मुंबईतील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शालेय पूर्ण केले आहे. इंग्लंडच्या आर्डलींग कॉलेजमधून सुहानाने पुढचे शिक्षण घेतले आहे. तर, आता सुहाना न्यूयॉर्क विद्यापीठातून अभिनयात पदवी मिळवण्यासाठी गेली आहे.

आर्यन खान - शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खानने लंडनच्या सेव्हनॉक्स शाळेत त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर आर्यन आता पदवी प्राप्त करण्यासाठी लॉस अँजेलिसच्या साऊर्थन कॅलिफोर्निया विद्यापीठात पुढचे शिक्षण घेतो आहे.

अनन्या पांडे - चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आहे. अनन्याने मुंबईतील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे.

अलाया फर्नीचरवालाने २०२०मध्ये सैफ अली खानच्या 'जवानी जानेमन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अलाया अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे. लंडन फिल्म अॅकॅडमीमधून अलायाने फिल्म आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केले आहे.

नव्या नवेली नंदा - बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने लंडनमधील सेव्हनॉक्स स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले आहेत. सध्या ती न्यूयॉर्क शहरातील फोर्डहॅम विद्यापीठातून उच्च शिक्षण घेत आहे. नव्याला चित्रपटसृष्टीत करिअर करण्याची इच्छा नसून ती तिच्या वडीलांना कामात मदत करणार आहे.

Read in English