अक्षयचं गाणं रिलीजपूर्वीच डिसलाईक, 'बुर्ज खलिफा'वर मिम्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 03:41 PM2020-10-17T15:41:41+5:302020-10-17T15:53:35+5:30

अक्षय कुमार याच्या आगामी 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमावरून वाद सुरू झाला आहे. काही लोक सोशल मीडियातून या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करत आहे.

काही लोकांचा आरोप आहे की, या सिनेमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिलं जात आहे. तर काही लोकांनी सिनेमाचं टायटल 'लक्ष्मी बॉम्ब' वर आक्षेप घेतला आहे. त्यांच्यानुसार, हे हिंदू धर्माच्या विरोधात आहे.

आता यावर स्पष्टीकरण देण्यासाठी सिनेमाचा दिग्दर्शक राघव लॉरेन्स समोर आला आहे आणि त्याने सांगितलं आहे की, त्याने तमिळमधील ओरिजिनल सिनेमा 'कंचना'च्या हिंदी रिमेकचं नाव बदलून 'लक्ष्मी बॉम्ब' का ठेवलं.

सिनेमाच्या टायटलबाबत बोलताना राघव लॉरेन्स म्हणाला की, 'आमच्या तमिळ सिनेमाचं मुख्य कॅरेक्टर कंचना होतं. कंचनाचा अर्थ सोनं होतो जे स्वत: लक्ष्मीचं एक रूप मानलं जातं.

आधी आम्ही हिंदीतही तेच तमिळसारखंच टायटल ठेवणार होतो. पण नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून हे नाव बदललं जेणेकरून हिंदी ऑडिअन्सना अपील करू शकू. मग यासाठी 'लक्ष्मी बॉम्ब' पेक्षा चांगलं आणखी काय असू शकलं असतं'.

या चित्रपटातील बुर्ज खलिफा हे गाणं उद्या रिलीज होणार असून अक्षयने काही तासांपूर्वीच या गाण्याचा टिझर आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

मात्र, अक्षयने टिझर शेअर करताच, ट्विटवरुन या गाण्याला डिसलाईक करण्यात येत आहे. अनेक मिम्स या गाण्यावरुन तयार केले जात आहेत.

गाणं उद्या रिलीज होणार असलं तरी, टिझरवरुन गाणं पसंद नसल्याचं अनेक नेटीझन्स सांगत आहेत.

दुबईतील बुर्ज खलिफाजवळ या गाण्याचे शुटींग झाले असून तेथील लोकेशन या गाण्यात दिसत आहे.

बुर्ग खलिफा हे गाणं बिगेस्ट पार्टी अथम्स असल्याचं अक्षयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय.

अक्षयचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून बुर्ज खलिफा हे गाणं उद्या रिलीज होणार आहे.

'लक्ष्मी बॉम्ब' या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. तो यात आसिफ आणि लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसेल. अक्षयसोबतच या सिनेमात मुख्य भूमिकेत कियारा अडवाणी दिसणार आहे