तान्हाजी फेम शरद केळकरची पत्नी आहे ही मराठमोळी अभिनेत्री, पाहा त्याच्या कुटुंबियांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 07:00 AM2020-05-21T07:00:00+5:302020-05-21T07:00:02+5:30

शरद केळकरने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. तान्हाजी या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला होता. शरदच्या खाजगी आयुष्याविषयी आम्ही आज तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत.

शरद केळकरच्या पत्नीचे नाव किर्ती गायकवाड केळकर असून ती देखील एक अभिनेत्री आहे.

'आक्रोश' या मालिकेत शरद आणि किर्ती यांनी सगळ्यात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. पण 'सात फेरे' या मालिकेमुळे शरद आणि किर्ती यांची जोडी घराघरांत पोहोचली.

पहिल्याच भेटीत शरदला किर्ती आवडली होती. किर्ती ही माझ्यासाठी 'लकी चार्म' आहे, असं शरद म्हणतो. किर्तीला भेटल्यावर मला 'सात फेरे' आणि 'सिंदूर तेरे नाम का' असे मोठे प्रोजेक्ट्स मिळाले, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

२००५ साली शरद आणि किर्ती रेशीमगाठीत अडकले.

किर्ती आणि शरद यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. आपल्याला शरदच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर किर्तीसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

शरद आणि किर्ती यांना एक मुलगी असून तिचे नाव किशा आहे. किशाचे अनेक फोटो आपल्याला किर्ती आणि शरदच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात.

किशा ही खूपच क्यूट असून त्या दोघांचीही ती प्रचंड लाडकी आहे.

शरदने काहीच दिवसांपूर्वी किशासोबतचा हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.

किर्तीने अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या असल्या तरी गेल्या काही वर्षांपासून ती अभिनयक्षेत्रापासून दूर आहे.