हनीमूनला सावत्र मुलीला सोबत घेऊन गेली दीया मिर्झा, नवरा वैभव रेखीने क्लिक केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 03:18 PM2021-03-27T15:18:15+5:302021-03-27T15:27:51+5:30

दीया मिर्झा सध्या मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेली आहे.

अभिनेत्री दीया मिर्झा सध्या मालदीवमध्ये हनीमून एन्जॉय करते आहे. ती काही दिवसांपासून मालदीवमधील फोटो शेअर करते आहे. तिचे हे फोटो तिचा नवरा वैभव रेखीने काढले आहेत. विशेष बाब म्हणजे हनीमूनला दीयासोबत तिची सावत्र मुलगी समायरादेखील गेली आहे.

दीया मिर्झाने मालदीवच्या समुद्र किनाऱ्याचे फोटो शेअर केले आहेत. यात तिने व्हाइट रंगाचा मॅक्सी ड्रेस परिधान केला आहे आणि हॅट घातली आहे.

दीया मिर्झाच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

हनीमूनच्या या फोटोंमध्ये दीया मिर्झासोबत कुठेही तिचा नवरा वैभव दिसला नाही. त्यामुळे चाहते त्याच्यासोबत फोटो पोस्ट कर, असे सांगत आहेत.

मागील महिन्यात दीयाने वैभवसोबत लग्न केले. तिचे हे दुसरे लग्न आहे.

दीयाचा दुसरा पती वैभव याचेही हे दुसरे लग्न आहे. वैभवशी लग्न करण्यासाठी दीयाने २०१९ मध्ये साहिल संघाला घटस्फोट दिला होता.

दीया मिर्झाने ऑक्टोबर २०१४मध्ये साहिल सिंघाशी लग्न केले होते. मात्र या दोघांचे लग्न फार काळा काही टिकले नाही.

साहिलला २०१९ मध्ये घटस्फोट घेत ती वेगळी झाली होती.

दियाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी रहना है तेरे दिल में मधील तिची भूमिका प्रेक्षकांना अधिक भावते.

दियाच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याची अधिक चर्चा रंगते.

Read in English