धाकड गर्लचा Wow लूक ,पाहा कंगणा राणौतचे Latest Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 12:49 PM2021-07-31T12:49:43+5:302021-07-31T12:56:05+5:30

बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगणाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगते. आता मात्र तिच्या नवीन फोटोंनी ती चाहत्यांना घायाळ करत आहे.

कंगणाने तिचे नवीन ग्लॅमरस फोटो चाहत्यांसह शेअर केले आहे.

कंगणाला पाहताच चाहत्यांच्याही नजर हटत नाहीय.

कंगणाचा हा फोटो पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल की पाहताच ती बाला, कलेजा खल्लास झाला….

तिच्या या फोटोंमधील घायाळ अदा कुणालाही अक्षरक्ष: वेड लावतील अशाच असतात.

नव्या फोटोशूटमधील कंगणाचा हा फोटो कुणालाही क्लीन बोल्ड करेल.

रिल लाइफमध्ये ज्यारितीने सुंदर दिसतो तितकेच सुंदर आणि लक्षवेधी रिअल लाइफमध्येही दिसावं असा खटाटोप कंगणाचा असतो.

त्यामुळे आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते.

कंगणाने आपल्या स्टाईलच्या माध्यमातून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न कायमच केला आहे.

ड्रेसिंग स्टाईलसह शूज, बॅग, गॉगल यामध्येही विविध प्रकारचे नवनवे ब्रँड्स कंगणाकडे पाहायला मिळतात.

रिल लाइफमध्ये फॅशनिस्ट असणारी कंगणा रिअल लाइफमध्येही सुंदर दिसण्यासाठी तितकाच तामझाम करते.

रसिकांनी प्रेमाने दिलेले बॉलीवुडची क्वीन हे नाव सार्थ ठरवण्याचा बहुदा कंगणाचा हा प्रयत्न असावा नाही का ?