'देवी'च्या सक्सेस पार्टीला दिसले हे सेलिब्रेटी, काजोलच्या लूकचीच रंगलीय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 07:00 AM2020-03-16T07:00:00+5:302020-03-16T07:00:01+5:30

देवी या शॉर्ट फिल्मचीच सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.

देवी या लघुपटात काजोल, श्रुती हासन, नेहा धुपिया, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी, मुक्ता बर्वे, शिवानी रघुवंशी, संध्या म्हात्रे, रमा जोशी आणि यशस्विनी दयामा या नऊ अभिनेत्री आहेत.

देवी हा लघुपट केवळ दोन दिवसांत चित्रित करण्यात आलेला आहे.

देवी या लघुपटात नऊ पीडित महिला आणि त्यांच्या कथा आहेत.

देवी या लघुपटाचे दिग्दर्शन आणि लेखन प्रियांका बॅनर्जीने केले आहे.

देवी हा लघुपट आतापर्यंत करोडाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

देवी या लघुपटाच्या कथेचे आणि त्यातील कलाकारांच्या अभिनयाचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे.

देवी या लघुपटाचे जोरदार प्रमोशन काजोलने केले होते.

टॅग्स :काजोलKajol