बाप रे बाप! दीप‍िका पादुकोणच्या बॅगची किंमत वाचून जाल चक्रावून, त्यात घेऊ शकाल दोन आयफोन...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 10:41 AM2020-12-30T10:41:17+5:302020-12-30T10:47:04+5:30

सर्वातआधी बोलूया तर दीपिकाच्या ड्रेसिंगबाबत तर तिने ओव्हर साइज बटन-डाऊन पुलओव्हर शर्टला हाय राइज फ्लेयर्ड पॅंट्ससोबत पेअर केलं होतं.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे कपल आपल्या फॅशनसाठी नेहमीच ओळखलं जातं. सध्या दीपिका तिच्या एका हॅडबॅगच्या किंमतीमुळे चर्चेत आहे. नुकतंच दीपिका आणि रणवीरला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. इथे दीपिकाच्या हॅंडबॅगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या हॅंडबॅगच्या किंमतीत तुम्ही दोन आयफोन खरेदी करू शकता.

सर्वातआधी बोलूया तर दीपिकाच्या ड्रेसिंगबाबत तर तिने ओव्हर साइज बटन-डाऊन पुलओव्हर शर्टला हाय राइज फ्लेयर्ड पॅंट्ससोबत पेअर केलं होतं. त्यासोबतच तिने लॉंग ट्रेंच को कॅरी केला होता. या लूकमध्ये दीपिका कमाल दिसत होती.

तिने कपड्यांवर मॅच होणारा बेज कलरचा मास्क लावला होता. सोबतच लेस-अप लेटर प्लेटफॉर्म फूटवेअर घातले होते. या कम्प्लिट लूकमध्ये तिच्या हॅंडबॅगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

दीपिकाने Bottega Veneta The Chain Cassette bag घेतली होती. या बॅगची किंमत अमेरिकन डॉलरच्या हिशेबाने 3800 USD आहे. भारतीय करन्सीनुसार ही किंमत 2,78,902 रुपये इतकी आहे. इतक्या रूपयात तर दोन आयफोन खरेदी केले जाऊ शकतात. एका आयफोनची किंमत १ लाख १९ हजार आहे.

तेच रणवीर सिंह हा सुद्धा आपल्या यूनिक फॅशन अंदाजासाठी ओळखला जातो. त्याने चेक प्रिंट स्वेटर आणि पॅंटसोबत बेज बटन-डाउन ट्रेंच कोट घातला आहे. आपला लूक त्याने ब्राउन लेस-अप स्नीकर्स, बेज मास्क, सनग्लासेस आणि बेसबॉस कॅपने कम्प्लिट केला होता.