दीपिका पादुकोणची बहीणही दिसते 'लय भारी', या क्षेत्रात कमावलंय नाव, पाहा PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 02:10 PM2021-02-04T14:10:30+5:302021-02-04T14:15:38+5:30

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आज आघाडीच्या अभिनेत्रांमध्ये गणली जाते. इतकेच काय तर सगळ्यात महागडी अभिनेत्री म्हणूनही ती आज ओळखली जाते. पण दीपिकाप्रमाणेच तिची बहीण अनिशानेदेखील तिच्या क्षेत्रात नाव कमावले आहे.

अनिशाही दीपिकाची धाकटी बहीण आहे. अनिशा पादुकोण यांच्या वाढदिवशी दीपिकाने आपल्या बहिणीसह एक फोटो शेअर केला आहे.

यासह दीपिकाने अनिशासाठी एक खास मेसेजही तिने लिहीला आहे.

अनिशादेखील दीपिकाप्रमाणेच सुंदर दिसते. शूटिंगमधून निवांतम मिळताच दीपिका तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी घरी जाते.

बहिणीसोबत दीपिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर तिने शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

पण तरीही शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची बहीणच भाव खाऊन जाते.

तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर नजर टाकली तर तुम्हाला तिचे असे अनेक फोटो पाहायला मिळतील ज्यात तिच्या कुटुंबासह ती एन्जॉय करताना दिसते.

आपल्या कामात कितीही बिझी असली तरी दीपिका कुटुंबालाही वेळ देते.

अनिशाही एक गोल्फ प्लेअर आहे. अनेक आतंरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिने आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

२०१९ मध्ये पार पडलेल्या टेनिस विंबल्डन फायनलसाठी दोघी बहिणींनी हजेरली लावली होती.

त्यावेळी दोघींनी एकमेकांना मिळते जुळते ड्रेसिंग स्टाइल करत लक्ष वेधून घेतले होते.