राम चरणच्या मोठ्या बहिणीला कधी पाहिलंय का? फॅशन जगतात कमावतीये नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 05:30 PM2022-01-12T17:30:00+5:302022-01-12T17:30:00+5:30

Sushmitha: रामचरण हे नाव आज कोणत्याही व्यक्तीला नवीन नाही. परंतु, रामचरण याला दोन बहिणीदेखील आहेत हे फार मोजक्या जणांना माहित आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी याचा मुलगा राम चरण याच्याविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. रामचरणदेखील आपल्या वडिलांप्रमाणे कलाविश्वात सक्रीय आहे.

रामचरण हे नाव आज कोणत्याही व्यक्तीला नवीन नाही. परंतु, रामचरण याला दोन बहिणीदेखील आहेत हे फार मोजक्या जणांना माहित आहे.

आज आपण रामचरण याची बहीण आणि चिरंजीवी यांची लेक सुष्मिता हिच्याविषयी जाणून घेऊयात.

चिरंजीवी यांच्या मोठ्या मुलीचं नाव सुष्मिता कोनिडेला असं आहे.

मध्यंतरी सुष्मिता अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार अशी चर्चा होती. परंतु, सुष्मिता अन्य एका क्षेत्रात कार्यरत आहे.

सुष्मिता प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर आहे. आजवर तिने तेलुगू कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींचे कपडे डिझाइन केले आहेत.

सुष्मिताने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मधून पदवी प्राप्त केली आहे.

सुष्मिताने ‘रंगस्थलम’ आणि ‘सई रा नरसिंह रेड्डी’ सारख्या चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम केलं आहे.

रामचरण तेजा आणि त्याच्या दोन बहिणी.

सुष्मिता सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.