coronavirus: मास्क लावून प्ले स्कूलच्या बाहेर स्पॉट झाली सनी लिओनी, पहा कशी घेतेय फॅमिलीची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 02:43 PM2020-03-21T14:43:34+5:302020-03-21T14:45:52+5:30

Sunny Leone

नुकतीच अभिनेत्री सनी लिओनी तिच्या तीन मुलांसोबत जुहू येथे स्पॉट झाली

सनी तिथे प्ले स्कूलच्या बाहेर आपल्या मुलाला कडेवर घेऊन उभी असल्याचं पहायला मिळाले.

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे सनीने व तिच्या मुलांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. देशभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळेच जण काळजी घेत आहेत.

सनी नेहमी आपल्या फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत असते.

सोशल मीडियावर सनीने मुले व नवऱ्यासोबतचा फोटो शेअर केला होता. ज्यात सर्वांनी मास्क घातलेला पहायला मिळाला होता.

या फोटोत सर्वांनी सारख्याच रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

त्यापूर्वी सनीने एअरपोर्टवरील एक फोटो शेअर केला होता आणि चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते.

सनीने नुकताच एक टिकटॉक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती मिस्टर इंडिया स्टाईलमध्ये गायब होताना दिसत होती.