Children day Special : रातोरात ‘स्टार ’ झालेले हे बालकलाकार आहेत कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 03:43 PM2021-11-14T15:43:55+5:302021-11-14T15:55:09+5:30

Children day Special : एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले अनेक बालकलाकार सध्या स्ट्रगल करत आहेत. पाहा यादी...

‘शाका लाका बूम बूम’मध्ये बालकलाकाराच्या भूमिकेत दिसलेला किंशुक वैद्य आजही स्ट्रगल करतोय. शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंडस्ट्रीत कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. काही टीव्ही शोमध्येही त्याने काम केले. पण बालपणीच्या भूमिकेसारखी लोकप्रियता अद्यापही त्याला मिळवता आलेली नाही.

‘सोनपरी’ची फ्रूटी आठवतेय ना? तन्वी हेगडे हिने ही भूमिका साकारी होती. लहानपणी 150 वर जाहिरातींमध्ये ती झळकली. सध्या ती मराठी सिनेमांमध्ये नशीब आजमवतेय.

‘कहो ना प्यार है’ या सिनेमात हृतिक रोशनच्या लहान भावाची भूमिका साकारणारा अभिषेक शर्मा यालाही मोठ्या ब्रेकची प्रतीक्षा आहे.

‘कसौटी जिंदगी की’मध्ये स्रेहाच्या भूमिकेत झळकलेली श्रिया शर्मा एकेकाळी लोकप्रिय बालकलाकार होती. पण बॉलिवूड चित्रपटांत मात्र तिचा सिक्का चालला नाही. सध्या ती तामिळ इंडस्ट्रीत काम करतेय.

‘कल हो ना हो’मध्ये प्रीती झिंटाच्या छोट्या भावाची भूमिका साकारणारा बालकलाकार अथित नाईक सध्या दिग्दर्शन व फोटोग्राफीत नशीब आजमावतोय.

संजय लीला भन्साळींच्या ‘ब्लॅक’मधील चिमुकली कोण तर आयशा कपूर. आयशा इतक्या वर्षांत फक्त शेखर कपूरच्या ‘पानी’ या सिनेमात झळकलीये.

‘तारें जमीं पे’ या चित्रपटातील बालकलाकार दर्शिल सफारी सध्या काय तर स्ट्रगल करतोय. त्यालाही मोठ्या संधीची प्रतीक्षा आहे.

‘तारा रम पम’ चित्रपटात अहसास चन्नाने एका चिमुकल्याची भूमिका साकारली होती. अहसास सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. पण टीव्हीवर तिला मोठा ब्रेक अद्याप मिळालेला नाही.

‘करिश्मा का करिश्मा’मध्ये रोबोट बनलेली झनक शुक्ला अनेक चित्रपटांत झळकली. पण आताश: कमबॅक करण्याचा तिचा इरादा नाही. मिळवायची तेवढी लोकप्रियता मिळवली. आता मला शांततेत आयुष्य जगायचंय, असं अलीकडे ती एका मुलाखतीत म्हणाली होती.