अति मेकअप करणं पडलं महागात; 'छोरी'फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 01:07 PM2021-12-09T13:07:43+5:302021-12-09T13:13:49+5:30

Yaaneea bharadwaj:'साधारणपणे दररोज मला तीन ते चार तास प्रोस्थेटिक्स मेकअप चेहऱ्यावर घेऊन वावरावं लागत होतं. हा मेकअप उतरवण्यासाठीही दोन तास जायचे.'

कोणताही कलाकार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतो. यासाठी तो त्याच्या अभिनयशैलीत, रुपात अनेक वेगवेगळे बदल करत असतो. परंतु, हाच बदल करणं एका अभिनेत्रीला चांगलाच महागात पडला आहे.

रुपेरी पडद्यावर वावरत असतांना कलाकारांना कायमच मेकअपचा आधार घ्यावा लागतो. यात सध्याच्या काळात मेकअपचेही अनेक प्रकार येऊ लागले आहेत. त्यातच चित्रीकरणाच्या निमित्ताने ही कलाकार मंडळी कित्येक तास हा मेकअप चेहऱ्यावर घेऊन फिरत असतात. मात्र, याच मेकअपच्या अतिवापरामुळे एक अभिनेत्री भेट रुग्णालयात दाखल झाली आहे.

अलिकडेच 'छोरी' (chhorii) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. हॉरर प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री यानिया भारद्वाज (Yaaneea Bharadwaj) हिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

छोरीमध्ये यानियाने भूताची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला प्रोस्थेटिक्स मेकअपचा आधार घ्यावा लागला होता. परंतु, वारंवार हा मेकअप केल्यामुळे तिला त्वचाविकारासह अन्य शारीरिक समस्याही उद्भवल्या.

अलिकडेच एका मुलाखतीत यानियाने प्रोस्थेटिक्स मेकअप केल्यामुळे कोणत्या समस्या उद्भवल्या हे सांगितलं.

"साधारणपणे दररोज मला तीन ते चार तास प्रोस्थेटिक्स मेकअप चेहऱ्यावर घेऊन वावरावं लागत होतं. हा मेकअप उतरवण्यासाठीही दोन तास जायचे. इतकंच नाही तर हा मेकअप करायला वेळ लागत असल्यामुळे मला दररोज इतरांपेक्षा कित्येक तास आधीच सेटवर पोहोचावं लागायचं", असं यानिया म्हणाली.

पुढे ती म्हणते, भूताचा लूक करणं फार कठीण होतं. या लूकमुळे मला अनेक शारीरिक समस्या उद्भवल्या. अनेकदा वॅक्सिंग केल्याप्रमाणे त्रास व्हायचा. हा लूक काढत असतांना बऱ्याचदा त्वचेतून रक्त यायचं. मला नीट जेवताही येत नव्हतं. तसंच या लूक हेवी असल्यामुळे शरीर दुखायचं. इतकंच नाही तर शरीर थकल्यामुळे तापही यायचा.

प्रोस्थेटिक्स मेकअप केल्यामुळे यानियाच्या फुफ्फुसांना सूज आली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अनेक शारीरिक व्याधी निर्माण झाल्यामुळे तिला जेवताही येत नव्हतं. त्यामुळे अनेकदा खालेलं सगळं अन्न तिचं उलटून पडायचं.

प्रोस्थेटिक्स मेकअप केल्यामुळे यानियाच्या फुफ्फुसांना सूज आली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अनेक शारीरिक व्याधी निर्माण झाल्यामुळे तिला जेवताही येत नव्हतं. त्यामुळे अनेकदा खालेलं सगळं अन्न तिचं उलटून पडायचं.

दरम्यान, यानिया एक लोकप्रिय अभिनेत्री असून छोरीमधील तिच्या भूमिकेचं सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात आलं. यानिया उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच तरबेज तलवारबाजदेखील आहे.