'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा

By सुवर्णा जैन | Published: September 24, 2020 06:00 AM2020-09-24T06:00:00+5:302020-09-24T06:00:00+5:30

रुपेरी पडद्यावर २००७ साली झळकलेला किंग खान शाहरुखचा चक दे इंडिया हा सिनेमा तुमच्या लक्षात असेलच. सिनेमात महिला हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवलं होतं अभिनेत्री विद्या माळवदेने.मराठमोळी अभिनेत्री असलेल्या विद्यावर या भूमिकेनंतर कौतुकाचा वर्षाव झाला होता. चक दे सिनेमाच्या यशानंतर विद्याने मॉडेलिंग आणि हिंदीत काम सुरु ठेवलं.

सुंदर आणि फीट दिसणं यासाठी विद्या खूप मेहनत घेते.

तिचे योगाचे काही फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल होतात.

खऱ्या आयुष्यात देखील विद्या तितकीच फिटनेस फ्रिक असल्याचे तिच्या या फोटोवरून स्पष्ट होते.

तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते.

विद्याचे हे फोटो पाहून चाहत्यांना देखील योगा करण्याची प्रेरणा मिळणार हे मात्र नक्की.

झी शेड्युलमध्येही ती स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देते आणि नियमित व्यायाम करते.

गेल्या अनेक वर्षांपासून विद्या योगा करते आहे.

योगा करण्यारोबरच आरोग्यला पोषक असं डाएट ती घेते

नियमित योगा आणि चालण्यामुळे फिजिकल आणि मेंटल बॅलेन्स ठेवणे शक्य होते. व्यायामुळे मला दिवसभर प्रसन्न वाटतं असल्याचे विद्याने सांगितले होते.

इतरांनाही योगा करण्याचा सल्ला ती देते.