रेड कार्पेटवर प्रियंकाचा ड्रेस सावरताना दिसला निक जोनास, दिल्या एकापेक्षा एक रोमॅन्टिक पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 04:44 PM2021-11-30T16:44:07+5:302021-11-30T16:51:56+5:30

British Fashion Awards 2021 : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनास यांच्या घटस्फोटाची चर्चा होती. होय, प्रियंकाने सोशल मीडियावरून जोनास हे सासरचं आडनाव हटवताच या चर्चांना उधाण आलं होतं. पण असं काहीही नाही...

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनास यांच्या घटस्फोटाची चर्चा होती. होय, प्रियंकाने सोशल मीडियावरून जोनास हे सासरचं आडनाव हटवताच या चर्चांना उधाण आलं होतं. पण असं काहीही नाही...

होय, ब्रिटीश फॅशन अवार्ड 2021 मध्ये प्रियंका व निकचा रोमॅन्टिक अंदाज बघता, घटस्फोटाच्या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं सिद्ध झालं आहे. या अवार्डच्या रेड कार्पेटवर प्रियंका व निकनं एकापेक्षा एक रोमॅन्टिक पोझ दिल्या.

अगदी निक प्रियंकाचा ड्रेस सावरतानाही दिसला. होय, प्रियंकाचा ड्रेस रेड कार्पेटमध्ये अडकला आणि निक लगेच बायकोच्या मदतीसाठी धावला. त्यानं तिचा ड्रेस ठीक केला आणि यानंतर प्रियंकासोबत झक्कास पोझ दिल्यात.

रेड कार्पेटवर प्रियंकाने कलरफुल ड्रेसमध्ये एन्ट्री घेतली. निक ब्लॅक अँड रेड सूटमध्ये दिसला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

काही दिवसांपूर्वी दिवस प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या घटस्फोटाच्या चर्चेन चाहते हैराण झाले होते. सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क लावले जात होते.

प्रियंकाने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पती निक जोनासचं आडनाव आपल्या नावासमोरून हटवलं होतं. त्यामुळे चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती.

पण नंतर हा एक पब्लिसिटी स्टंट होता हे स्पष्ट झालं होतं. जोनास ब्रदर्सचा ‘जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्ट’ या शोच्या प्रमोशनसाठी प्रियंकाने कदाचित मुद्दाम जोनास हे आडनाव हटवलं होतं.

जोनास आडनाव हटवलं की चर्चा होईल आणि चाहते अ‍ॅक्टिव्ह होतील, हे प्रियंकाला चांगलंच ठाऊक होतं. झालंही तसंच. तेव्हापासून प्रियंका सतत चर्चेत आहे.