इरफानसह 'या' बॉलिवूड स्टार्सने मृत्यूनंतर त्यांची संपत्ती केली दान; जाणून घ्या त्या कालाकारांची नाव आणि प्रॉपर्टीविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:01 AM2022-04-21T11:01:36+5:302022-04-21T11:08:27+5:30

Bollywood stars: गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. या कलाकारांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार, ऋषि कपूर, इरफान खान, श्रीदेवी, सुशांत सिंह राजपूत, लता मंगेशकर, जगदीप, सरोज खान आणि सिद्धार्थ शुक्ला या दिग्गज कलाकारांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. यामध्ये काही कलाकारांनी मृत्यूनंतर त्यांची संपत्ती दान केल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे हे कलाकार कोणते ते पाहुयात.

श्रीदेवी - बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी हिचं २४ फेब्रुवारी २०१८ मध्ये दुबईत निधन झालं. श्रीदेवीच्या निधनामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. परंतु, तिच्या निधनानंतर पती बोनी कपूर यांनी त्यांच्या संपत्तीचा अर्धा वाटा दान केला.

महाराष्ट्रातील एका गावात शाळा बांधण्यासाठी आणि तेथील मुलांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी हा पैसा दान केला.

इरफान खान - २एप्रिल २०२० मध्ये कॅन्सरमुळे इरफान खानचं निधन झालं. इरफान यांच्या निधनानंतर त्याच्या पत्नीने सुतापा सिकंदरने सांगितलं होतं की, इरफानने त्याच्या संपत्तीमधील सर्वात मोठा वाटा समाजकल्याणासाठी दान करायचं ठरवलं होतं.

त्यामुळे ही संपत्ती दान करण्यात आली. इरफान खानचं नेटवर्थ ६०० कोटी रुपये इतकं होतं.

सुशांत सिंह राजपूत- पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेल्या सुशांतच्या निधनामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. १४ जून रोजी सुशांतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुशांतला पूर्वीपासूनच दानधर्म करायची आवड होती. त्यामुळे त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाने त्याची सगळी संपत्ती दान करायचा निर्णय घेतला.

सिद्धार्थ शुक्ला - अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधनदेखील चटका लावून जाणारं होतं. सिद्धार्थने मृत्यूपुर्वी त्याचं मृत्यूपत्र तयार केलं होतं.

यात माझी संपत्ती दान करण्यात यावी असं त्याने नमूद केलं होतं. सिद्धार्थ ५० कोटींच्या संपत्तीचा मालक होता.

लता मंगेशकर - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या.

लता दीदींच्या मृत्यूपत्रानुसार, त्यांची सगळी संपत्ती त्यांनी दान करण्यास सांगितली होती. त्यांच्याकडे एकूण ३६० कोटी रुपयांची मालमत्ता होती.