In Pics: को-स्टार आवडला नाही म्हणून या 7 स्टार्सनी नाकारले मोठमोठे सिनेमे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 08:00 AM2020-07-31T08:00:00+5:302020-07-31T08:00:02+5:30

को-स्टार्स आवडला नाही म्हणून चित्रपट नाकारणाºयांचीबॉलिवूडमध्ये कमतरता नाही. सह-कलाकार आवडला नाही म्हणून आॅफर धुडकावून लावणारे इथे अनेक स्टार्स आहेत. त्यावर एक नजर...

ऐश्वर्या राय-इमरान हाश्मी : करण जोहरच्या कॉफी विद करण या शोमध्ये इमरान हाश्मीने ऐश्वर्याला ‘प्लास्टिक’ म्हटले होते. याचा राग म्हणा की आणखी काही पण ऐश्वर्याने इमरानसोबत काम करण्यास नकार दिला होता. ‘बादशाहो’मध्ये इमरानची वर्णी लागल्याचे कळताच दुसºयाच क्षणाला ऐश्वर्याने या सिनेमात काम करण्यास नकार दिला होता.

अमिताभ बच्चन-करिना कपूर : अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि करिना कपूरची बहिण करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला होता. मात्र हा साखरपुडा काही कारणाने मोडला. यानंतर करिनाने अमिताभसोबत काम करण्यास नकार दिला होता. ब्लॅक या सिनेमात अमिताभ व करिना दिसणार होते. नंतर यात करिनाच्या जागी राणी मुखर्जीची वर्णी लागली होती.

कतरिना कैफ -आदित्य राय कपूर : ‘फितूर’ या सिनेमात कतरिना व आदित्य एकत्र दिसले होते. मात्र या सिनेमानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या अफवांना वैतागून कतरिनाने यानंतर एका आदित्यसोबतचा एक सिनेमा करण्यास नकार दिला होता.

करिना कपूर-इमरान हाश्मी - करिना कपूर नेहमीच ए-स्टार्स लिस्टच्या हिरोंसोबत काम करते. चर्चा खरी मानाल तर इमरान हाश्मी आपला को-स्टार आहे म्हणून तिने एका सिनेमात काम करण्यास नकार दिला होता.

रणबीर कपूर-सोनाक्षी सिन्हा : रणबीर कपूर व सोनाक्षी यांना एकत्र एक सिनेमा आॅफर केला गेला होता. रणबीरला स्क्रिप्ट आवडली होती. पण हिरोईन दुसरी असेल तरच मी काम करेन, अशी त्याची अट होती. मेकर्सला सोनाक्षीच हवी होती. त्यामुळे रणबीरने हा सिनेमा नाकारला होता.

रणवीर सिंग-कतरिना कैफ : ‘बार बार देखो’ हा सिनेमा आधी रणवीर सिंग व कतरिनाला आॅफर झाला होता. मात्र रणवीरने कतरिनासोबत काम करण्यास नकार दिला होता. कारण तो दीपिकाला दुखावू इच्छित नव्हता. रणबीर कपूरमुळे दीपिका व कतरिनात त्यावेळी कॅट फाईट सुरु होती.

ऐश्वर्या राय-सलमान खान : ऐश्वर्या बच्चनने ‘बाजीराव मस्तानी’ हा सिनेमा साईनही केला होता असे म्हणतात. पण यात सलमान खान आहे म्हटल्यावर तिने म्हणे या सिनेमास नकार दिला होता.

Read in English