सना खान पतीसह मालदीव व्हॅकेशनवर, एअरपोर्टवर अदा केली नमाज; शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 11:09 AM2021-08-10T11:09:28+5:302021-08-10T11:18:29+5:30

सनाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दोघेही नमाज अदा करताना दिसत आहेत. सना म्हणते, आम्ही विमानतळावरच नमाज अदा केली. या व्हिडिओमध्ये सानाने विमानतळापासून ते सी-प्लेन राईडपर्यंत आणि नंतर हॉटेलपर्यंतचे प्रत्येक क्षण शेअर केले आहेत. (Sana Khan with husband offer namaz at airport)

फिल्म इंडस्ट्री सोडल्यानंतरही सना खान नेहमीच चर्चेत असते. तिने फिल्म इंडस्ट्री सोडली असली तरी, ती आपल्या चाहत्यांसाठी आपल्या वैयक्तीक आयुष्यातील अपडेट्स नेहमीच शेअर करत असते. सध्या सना मालदीवमध्ये पती अनस सय्यदसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मालदीव टूरची सुरुवात करताना सानाने विमानतळावर नमाज अदा केली. याचा एक व्हिडिओही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Bollywood Sana Khan with husband offer namaz at airport while maldives tour)

व्हिड‍िओमध्ये सनाने एअरपोर्टवरील कोरोना प्रोटोकॉल दाखवले. यात तीने, एअरपोर्टवर पूर्णपणे सुरक्षितता पाळली गेली. सर्वकाही अप-टू द मार्क हेते, असे सांगितले. यावेळी ती बुरख्यावर होती. मात्र, एअरपोर्टवर आनंद व्यक्त करताना ती स्वतःला बुरख्या मागेही लपवू शकली नाही.

सनाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दोघेही नमाज अदा करताना दिसत आहेत. सना म्हणते, आम्ही विमानतळावरच नमाज अदा केली. या व्हिडिओमध्ये सानाने विमानतळापासून ते सी-प्लेन राईडपर्यंत आणि नंतर हॉटेलपर्यंतचे प्रत्येक क्षण शेअर केले आहेत.

सनाने मालदीवमधील समुद्र किनाऱ्यांचा आनंदही घेतला. तीने शेअर केलेल्या फोटोत ती जांभळ्या रंगाच्या बुरख्यावर दिसत आहे.

सनाने फोटो शेअर करत पती अनस यांच्या थकव्यासंदर्भातही उल्लेख केला आहे. यासोबतच सनाने लिहिले आहे, 'बीचवर रिलॅक्स होताना... आणि हो माझे फोटो घेताना मियां थकले आहेत.

सनाचा पती अनसनेही मालदीवमधील अपडेट्स शेअर केले आहेत. त्याने पूलमधील एक फोटो शेअर केला आहे. याशिवाय तो सनासोबत टेबल टेनीस खेळातनाही दसला. हा व्हिडिओ शेअर करताना अनसने लिहिले, 'माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणजे त्याची पत्नी.'

दोघांचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सानाने नोव्हेंबर 2020 मध्ये अनसशी लग्न केले. तिने फोटो शेअर करून आपल्या लग्नासंदर्भात माहिती दिली होती.

सना आणि अनसच्या लग्नाची बातमी लोकांसाठी आश्चर्यचकित करणारी होती. सनाने एका मुलाखतीत सांगितले होते, की अनसशी लग्न करणे, हा एका रात्रीचा निर्णय नव्हता. यासाठी तिने अनेक वर्षे प्रार्थना केली होती.

अनससंदर्भात बोलताना ती म्हणाली होती, 'मला त्यांच्याबद्दल एक गोष्ट सर्वात चांगली वाटते, की ते 'शरीफ' आहेत, त्याच्याकडे 'हया' आहे. ते जजमेंटल नाहीत. माझे पती एक चांगली व्यक्ती आहेत आणि मला ते गुड-लुकिंग वाटतात. कदाचित तुम्हाला तसे वाटत नसेल, पण मला याची काळजी नाही.

लग्नानंतर दोघेही हनिमूनसाठी काश्मीरला गेले होते. काश्मीरातील त्याचे फोटो जबरदस्त व्हायरल झाले होते. सना तिच्या कुटुंबासोबत घालवलेला वेळ नेहमीच शेअर करत असते.

फोटो क्रेडिट- सना खान इंस्टाग्राम

Read in English