आमिर ते शाहरुख! हॅण्डसम दिसणाऱ्या 'या' अभिनेत्यांनी केलीये शरीरावर शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 01:19 PM2022-05-10T13:19:54+5:302022-05-10T13:26:21+5:30

Bollywood male actors: अभिनेता अक्षय कुमारनेही सर्जरी करुन त्यांचं सौंदर्य अबादित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

बॉलिवूड कलाकार त्यांच्या लूक आणि पर्सनालिटीकडे सर्वाधिक भर देत असतात. त्यामुळे आजपर्यंत अनेक कलाकारांनी त्यांच्या चेहऱ्यावर, शरीरावर असंख्य शस्त्रक्रिया केल्या आहेत. यात खासकरुन अभिनेत्रींनी केलेल्या शस्त्रक्रिया कायम चर्चेत येतात. परंतु, बॉलिवूडमध्ये असेही काही अभिनेता आहेत ज्यांनी हॅण्डसम दिसण्यासाठी शरीरावर शस्त्रक्रिया केली आहे. हे कलाकार कोणते ते पाहुयात.

शाहिद कपूर - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय या नावाने लोकप्रिय असलेल्या शाहिद कपूर कायमच त्याच्या गुड लुकिंगमुळे चर्चेत येत असतो. यात त्याच्या क्युटनेससह त्याचा रफ लूकही नेटकऱ्यांना आवडतो. परंतु. शाहिदने त्याच्या नाकावर प्लास्टिक सर्जरी केली आहे. शाहिदने नोज जॉब केलं आहे.

सैफ अली खान- बॉलिवूडचा नवाब या नावाने विशेष प्रसिद्ध असलेल्या सैफनेही शस्त्रक्रिया करुन त्याचं रूप चेंज केलं आहे. सैफने बोटॉक्स ट्रिटमेंट घेतली आहे. सैफने त्याच्या डोळ्याखालील काळी वर्तुळं सर्जरीच्या माध्यमातून दूर केली होती.

रणबीर कपूर - सावरियाँ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा रणबीर आज लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. रणबीरची फिमेल फॅन्समध्ये तुफान क्रेझ आहे. मात्र, रणबीरनेही त्याच्या लूकमध्ये बदल केला आहे. त्याने हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे.

सलमान खान- दबंग खान, भाईजान अशा अनेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या सलमानने एका मुलाखतीत स्वत: त्याच्या हेअर ट्रान्सप्लांटविषयी खुलासा केला होता. विशेष म्हणजे यापूर्वी त्याने बोटॉक्स आणि चीक फिलर्स सर्जरीही केली आहे.

आमिर खान- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या गुड लुकिंगमुळे कायम चर्चेत असतो. मात्र, आमिरने कॉस्मेटिक सर्जरी केली आहे. या सर्जरीच्या माध्यमातून त्याने त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर केल्या आहेत.

शाहरुख खान- किंग खान शाहरुखने बोटॉक्स आणि काही इंजक्शनच्या माध्यमातून स्वत: ला चिरतरुण ठेवायचा प्रयत्न करत आहे.

करण जोहर - करण जोहरनेदेखील बोटॉक्स सर्जरी केली आहे. याव्यतिरिक्त त्याने अन्यही काही सर्जरी केल्याचं सांगण्यात येतं. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने चीक बोन्स आणि नाकावर डर्मल फिलर केलं आहे.

हिमेश रेशमिया - लोकप्रिय गायक हिमेश रेशमिया कलाविश्वात आला त्यावेळी तो कायम टोपी परिधान करुन चाहत्यांसमोर येत होता. मात्र, आता तो त्याचे केस मुद्दाम फ्लॉन्ट करतो. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे.

अक्षय कुमार- अक्षय कुमारला केसगळतीची समस्या निर्माण झाल्यामुळे त्याने हेअर ट्रान्सप्लांट केलं. मात्र, हे फार कमी जणांना माहित आहे.

कपिल शर्मा- प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यानेही हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे.