Amitabh Bachchan पासून Ajay Devgn पर्यंत! 'या' बॉलिवूड स्टार्सने केलंय भोजपुरी चित्रपटांमध्ये काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 02:04 PM2022-01-16T14:04:06+5:302022-01-16T14:09:04+5:30

Bhojpuri film: बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी हिंदीप्रमाणेच मराठी, भोजपुरी वा अन्य भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी हिंदीप्रमाणेच मराठी, भोजपुरी वा अन्य भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे खासकरुन भोजपुरीमध्ये झळकलेले बॉलिवूड कलाकार कोणते ते पाहुयात.

अमिताभ बच्चन - बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात हिंदीसह अन्य भाषिक चित्रपटांचाही समावेश आहे. २००६ मध्ये बिग बींनी 'गंगा' या भोजपुरी चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक चड्ढा यांनी केलं होतं. त्यानंतर 'गंगोत्री', 'गंगादेवी' या चित्रपटांमध्येही ते झळकले आहेत.

धर्मेंद्र - बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांनी बॉलिवूडसह पंजाबी आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. विमल कुमार दिग्दर्शित २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या देश परदेश चित्रपटातून त्यांनी भोजपुरी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.

धर्मेंद्र यांनी 'दुश्मन के खून पानी ह', 'इंसाफ की देवी', आणि 'दरिया दिल' या भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

अजय देवगण - बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने २००६ मध्ये 'धरती कहे पुकार के' या चित्रपटातून भोजपुरी कलाविश्वात डेब्यू केला.

जॅकी श्रॉफ- २००६ साली प्रदर्शित झालेला 'बलिदान' हा जॅकी श्रॉफचा पहिला भोजपुरी चित्रपट आहे.

शत्रूघ्न सिन्हा - शत्रूघ्न सिन्हा मूळचे बिहारचे असल्यामुळे भोजपुरी भाषेसोबत त्यांचा जवळचा संबंध आहे. त्यांनी २०० ६ मध्ये 'राजा ठाकुर' या भोजपुरी चित्रपटात काम केलं होतं.