Flashback 2019 : 2019 मध्ये भारतातील या बॉलिवूड सिनेमांनी केली सर्वात जास्त कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 11:44 AM2019-12-26T11:44:58+5:302019-12-26T12:57:09+5:30

बघता बघता २०१९ हे वर्ष संपत आले आहे. या वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली तर काही फ्लॉप ठरले. पण काही असे देखील चित्रपट आहेत ज्यांनी हॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकले. आज आपण जाणून घेणार आहेत २०१९ मध्ये हिट ठरलेले काही चित्रपट...

या यादीमधील सर्वात पहिला चित्रपट म्हणजे वॉर. बॉलिवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची उत्तम केमिस्ट्री असलेला ‘वॉर’ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

या यादीमधील सर्वात पहिला चित्रपट म्हणजे वॉर. बॉलिवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची उत्तम केमिस्ट्री असलेला ‘वॉर’ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींहून अधिक कमाई केली.

बॉलिवूडमध्ये आजवर आपण बऱ्याच प्रेमकथा पाहिल्या आहेत. दिग्दर्शक संदीप वांगा यांचा 'कबीर सिंग' मात्र या सर्वांपेक्षा वेगळा आहे.

तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हा हिंदी रिमेक आहे. शाहिद कपूर व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ थोडी हटके प्रेमकहाणी सांगतो. या चित्रपटाने ३५० कोटींहून अधिक कमाई केली.

‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’, असं म्हणणाऱ्या भारताच्या सूडाची कहाणी म्हणजेच ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपट. भारतातील शहीद झालेल्या जवानांचा कसा सूड घेतला याची शौर्यगाथा म्हणजेच ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक.’

या चित्रपटात अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत असून परेश रावल, मोहित रैना, किर्ती कुल्हारी, यामी गौतम यांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३४० कोटींहून अधिक गल्ला जमवला.

बॉलिवूड दबंग खान सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा 'भारत' हा चित्रपट (५ जून) ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सलमानची पाच वेगवेगळी रुप प्रेक्षकांना पाहता आली. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं मन जिंकण्यास यशस्वी ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३१० कोटींहून अधिक कमाई केली.

मिशन मंगल हा चित्रपट मंगळयान मोहिमेतील प्रमुख वैज्ञानिक राकेश धवन आणि त्यांचे सहकारी व आदी वैज्ञानिकांना हा चित्रपट म्हणजे एक मानवंदना आहे.

हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने २८० कोटींहून अधिक गल्ला कमावला होता

हाऊसफुल ४ हा भारतीय हिंदी भाषेचा विनोदी-नाटक चित्रपट आहे . हाऊसफुलच या चित्रपटाचा हा चौथा भाग आहे

हाऊसफुल ४ या चित्रपटाने ₹ २७९.१३ कोटींहून अधिक गल्ला कमावला होता