८ बॅकग्राऊंड डान्सर जे आज बॉलिवूडचे सुपरस्टार बनले आहेत, यांना ओळखलं होतं का तुम्ही?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 03:12 PM2021-11-20T15:12:02+5:302021-11-20T15:21:59+5:30

Bollywood celebs : बॉलिवूडमध्ये करिअर बनवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. काहींना यातून मार्ग सापडतो तर काही मागेच राहतात. इथे केवळ टॅलेंटच नाही तर तुमची इच्छाशक्ती आणि पेशन्सही महत्वाचे ठरतात. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा काही स्टार्सबाबत सांगणार आहोत जे त्यांच्या करिअरच्या सुरूवातीला बॅकग्राऊंड डान्सर होते आणि त्यांनी बॉलिवूड स्टार होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

शाहिद कपूर - भलेही शाहिद कपूरचे वडील बॉलिवूड अभिनेता होते, पण त्यानेही इतरांप्रमाणे आपल्या करिअरमध्ये मोठा संघर्ष केला. शाहिदने 'ताल' आणि 'दिल तो पागल है' सारख्या सिनेमांमध्ये सपोर्टिंग डान्सर म्हणून काम केलं.

दीपिका पादुकोण - दीपिकाचा नंबर आज बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये लागतो. तिने सुद्धा 'दिल तो पागल है' सिनेमात अभिनेत्रीच्या मागे काही ज्युनिअर आर्टिस्टसोबत डान्स केला होता.

डेजी शाह - डेजी शाह अभिनेत्री असण्यासोबतच चांगली डान्सरही आहे. तिने 'तेरे नाम' सिनेमात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं.

रणवीर सिंह - बॉलिवूड स्टार रणवीर सिंह यानेही बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं आहे. त्याने 'कभी खुशी कभी गम' आणि 'कोई मिल गया' मद्ये सपोर्टिंग डान्सर म्हणून काम केलं होतं.

दीया मिर्झा - माजी मिस इंडिया दीया मिर्झानेही बॉलिवूडमध्ये करिअर बनवण्यासाठी मोठा संघर्ष केला. ती साउथचा सिनेमा एन स्वसा कात्रे मध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसली होती.

अरशद वारसी - अभिनेता अरशद वारसीने सुरूवातीचे काही वर्ष इंडस्ट्रीत कोरिओग्राफर म्हणून काम केलं होतं. त्याने आग से खेलेंगे सिनेमात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं.

सुशांत सिंह राजपूत - सुशांत सिंह राजपूतने शामक डावरच्या डान्स अकॅडमीमद्ये डान्स शिकला होता. त्यामुळे त्याने अनेक सिनेमात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं. तो धूम २ मध्ये हृतिकच्या मागे डान्स करताना दिसला होता.

Read in English