कोणाला हवी रविवारची सुट्टी, कोणाला पर्सनल कुक ...; सिनेमा साईन करताना सेलिब्रिटींचे नखरे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 02:32 PM2021-07-30T14:32:43+5:302021-07-30T14:40:51+5:30

बॉलिवूडच्या ए लिस्ट कलाकारांचा थाट काही औरच असतो. मग डिमांड आल्याच. चित्रपट साईन करताना या कलाकारांचे नको ते नखरे निर्मात्यांना झेलावे लागतात. त्यावरच एक नजर...

पिळदार शरीरयष्टी, सिक्स पॅक्स अ‍ॅब्ससाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. साहजिकच या बॉडीसाठी त्याला खुप मेहनत घ्यावी लागली आहे. त्याचे कारण आहे तो घेत असलेले डाएट, व्यायाम, पॉझिटिव्हिटी. त्याच्या डाएटबद्दल कुठलाही हलगर्जीपणा त्याला चालत नाही. म्हणून तो शूटिंगवेळीही त्याचा स्वत:चा कुक ठेवत असतो. पूर्ण दिवस शूट असेल किंवा आऊटडोअर शूट असेल तर त्याला त्याचा कुक सोबत लागतो.

आमिर खान म्हणजे परफेक्शनिस्ट. त्याला सगळं काही परफेक्ट लागतं. म्हणूनच कोणताही लो अँगल शॉट शूट होणार नाही, ही त्याची अट असते. मुळात लो अँगल शॉट देताना आमिर लाजतो. त्यामुळे तो असे शॉट टाळतो.

भाईजान सलमान खान दबंग स्टार सलमान खान. सल्लूमियाँची एकच अट असते, ती म्हणजे किसींग सीन न देण्याची. इंटिमेट वा किसींग सीन्स देण्यास तो अजिबात तयार होत नाही.

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार हा इंडस्ट्रीचा सर्वात बिझी स्टार. वर्षाला 5-6 सिनेमे करणारा अक्की सिनेमे करतो, पण ते त्याच्या अटीवर. कोणताही सिनेमा त्याची एकच अट असते. ती म्हणजे त्याला रविवारी सुटी हवी असते. त्याला त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवता यावा म्हणून त्याला ही आठवड्याची सुटी आवश्यक वाटते. ही अट मान्य झाली नाही तर तो थेट नकार कळवतो.

बेबोचे तर नखरे विचारूच नका. केवळ ‘ए’ लिस्टर्स अभिनेत्यांसोबतच करणार, हा तिचा अलिखित नियम आहे. बी ग्रेड किंवा नवोदित आर्टिस्ट असेल तर मी काम करणार नाही, असे ती सिनेमाची स्क्रिप्ट ऐकण्याआधीच स्पष्टपणे सांगते.

सलमान खान प्रमाणेच शाहरूख खानचीही हीच अट असते. ‘नो किसिंग सीन्स’ असे सिनेमा साईन करण्याआधीच तो सांगतो. जब तक हैं जान मध्ये त्याने कतरिना कैफला किस केले होते. पण, ती स्क्रिप्टची गरज होती म्हणून तो सीन केल्याचे शाहरूखने अनेक मुलाखतीत सांगितले आहे.

‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा ही सुद्धा कुठलेही लिपलॉक्स, इंटीमेट सीन्स आणि तोकड्या कपडयांतील सीन्स न करण्याच्या अटीवरच सिनेमा साईन करते. स्क्रिप्टची गरज असताना ती एखादा किस करायला तयार होते.

बॉलिवूडची पंगा गर्ल हिच्याबद्दल सांगायचे तर कुठलाही सिनेमा साईन करताना तिची केवळ एकच अट असते ती म्हणजे ती थेट चित्रपटाच्या टीमसोबत बोलणार नाही. तिची पर्सनल असिस्टंट सर्वांसोबत संवाद साधणार. जर एखाद्या व्यक्तीला तिच्यासोबत बोलायचे असेल तर सर्वप्रथम तिच्या पर्सनल असिस्टंटसोबत बोलावे लागते. कंगनाऐवजी तीच सर्व प्रश्नांची उत्तरे देते. त्यामुळे तिची ही पीए सतत कंगनाच्या मागेपुढे असते. साहजिक निर्मात्यांना तिलाही झेलावे लागते.

Read in English