कुणी आवाजाचा तर कुणी पार्श्वभागाचा, बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी बॉडी पार्ट्सचा काढला आहे विमा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 01:42 PM2022-01-13T13:42:07+5:302022-01-13T14:14:25+5:30

Bollywood celebrities body parts insurance : सेलिब्रिटी हे आकर्षक होण्याचं एक कारण त्यांचे अट्रॅक्टिव बॉडी पार्ट्सही असतं. याचा त्यांना गुड लूकसाठी फायदा होतो. आज आम्ही तुम्हाला अशा सेलिब्रिटींबाबत सांगणार आहोत ज्यांनी त्यांच्या बॉडी पार्ट्सचा इन्शुरन्स काढला आहे.

कलाकारांवर प्रेक्षक भरपूर प्रेम करतात. कारण त्यांच्यात टॅलेंट भरपूर असतं आणि त्यांची आकर्षक पर्सनॅलिटी त्यांच्यावर फिदा होण्यापासून कुणालाही रोखू शकत नाही. सेलिब्रिटी हे आकर्षक होण्याचं एक कारण त्यांचे अट्रॅक्टिव बॉडी पार्ट्सही असतं. याचा त्यांना गुड लूकसाठी फायदा होतो. आज आम्ही तुम्हाला अशा सेलिब्रिटींबाबत सांगणार आहोत ज्यांनी त्यांच्या बॉडी पार्ट्सचा इन्शुरन्स काढला आहे.

लता मंगेशकर - लता मंगेशकर यांच्यावर सगळेच प्रेम करतात. आजही त्यांची गाणी आवडीने ऐकली जातात. त्यांच्या सुमधूर आवाजाने त्यांची गाणी आयकॉनिक झाली आहेत. त्यांना मिळालेला आवाज देवाचं खास गिफ्ट आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आवाजाचा विमा काढला आहे.

प्रियांका चोप्रा - प्रियांका आज एक इंटरनॅशनल सेलिब्रिटी बनली आहे. २००० साली मिस वर्ल्ड विजेती राहिलेल्या प्रियांकाची एक खास गोष्ट सर्वांनाच खूप आवडते. ती म्हणजे तिची स्माइल. प्रियांकालाही हे चांगलंच माहीत आहे. म्हणूनच तिने तिच्या स्माइलचा विमा काढला आहे.

सनी देओल - सनी देओल आपल्या दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. त्याचा सर्वात लोकप्रिय डायलॉग 'ये ढाई किलो का हाथ' आजही लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतो. त्यामुळेच सनी देओलने आपल्या आवाजाचा आणि डायलॉग डिलीवरीचा विमा काढण्याचा निर्णय घेतला होता.

नेहा धुपिया - अभिनेत्री नेहा धुपिया आज भलेही रूपेरी पडद्यापासून दूर आहे. पण तिची फॅन फॉलोईंग मोठी आहे. तिने तिच्या बटचा म्हणजे पार्श्वभागाचा विमा काढला आहे. तिने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिला एका कंपनीने संपर्क केला होता ज्यांनी जेनिफर लोपेजच्या बटचा इन्शुरन्स केला होता. त्यानंतर तिने हा निर्णय घेतला.

सानिया मिर्झा - टेनिस स्टार सानिया मिर्झा भारतातील टॉप खेळाडूंपैकी एक आहे. टेनिस प्लेअर असल्याने तिला तिच्या हातांचा योग्य पद्धतीने वापर करावा लागतो. यामुळे सानियाने तिच्या हातांचा विमा काढला आहे.

रजनीकांत - रजनीकांत जास्तकरून साऊथ इंडियन सिनेमात काम करतात. ते एक मेगा स्टार आहेत. त्यांनी वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करत आहे. त्यांच्या आवाजावर खासकरून लोकांचं प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आवाजाचा कॉपीराइट आणि इन्शुरन्स काढला आहे.

मिनिषा लांबा - ३३ वर्षीय मिनिषा लांबाने 'यहां' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. २०१४ सालापासून ती आता इंडस्ट्रीत अॅक्टिव नाही. मिनिषाचं नेहमीच तिच्या परफेक्ट बटमुळे कौतुक केलं जातं. त्यामुळे तिने तिच्या बटचा विमा काढला होता.

विजेंदर सिंह - विजेंदर सिंह हा बेस्ट बॉक्सरपैकी एक आहे. त्याने फार कमी वयातच बॉक्सिंगला सुरूवात केली होती. २०१४ मध्ये त्याने बॉलिवूडमध्ये 'फगली' सिनेमात काम केलं होतं. पण बॉक्सींग हे त्याचं मुख्य काम होतं. विजेंदरने त्याच्या बोटांचा विमा काढला आहे

राखी सावंत - कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत नेहमीच वादग्रस्त विधान करून चर्चेत राहते. राखीनेही नेहा धुपिया आणि मिनिषा लांबाप्रमाणे आपल्या बटचा विमा काढला आहे.

अमिताभ बच्चन - अमिताभ बच्चन यांची बातच वेगळी आहे. त्यांचा अभिनय तर सर्वांना चकित करतोच सोबतच त्यांचा दमदार आवाज खास लक्षात राहतो. त्यांनी त्यांच्या आवाजाचा विमा काढला आहे.

मल्लिका शेरावत हिंदीसोबतच काही इंग्रजी आणि चायनीज सिनेमात दिसली आहे. 'मर्डर' सिनेमातून तिने खळबळ उडवून दिली होती. तिच्याकडे अमेझिंग बॉडी आहे. त्यामुळे तिने तिच्या बॉडीचा इन्शुरन्स काढला आहे.

बॉलिवूडचा माचोमॅन जॉन अब्राहम हा बॉलिवूडच्या सर्वात हॉट मेल सेलिब्रिटींपैकी एक आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्याने त्याच्या बटचा विमा काढला आहे.