बॉलिवूडच्या या सौंदर्यवतींची कमाई त्यांच्या पतीपेक्षाही आहे दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 12:33 PM2020-04-24T12:33:53+5:302020-04-24T12:42:04+5:30

नेहमीच अभिनेत्रींनी सिनेसृष्टीत मानधन हे अभिनेत्यांच्या तुलनेत कमी दिले जाते. यातही आता वेळेनुसार परिस्थीत तशी बदलत असून प्रत्येकाला कामानुसार मोबदला दिला जातो. मात्र हे सगळ्याच अभिनेत्रींबाबत घडत नाही. तसेच आता हम भी किसीसे कम नही म्हणत अभिनेत्रींची कमाई ही त्यांच्या पतीच्या कमाईच्या दुप्पट असल्याचेही पाहायला मिळतंय.पाहुयात कोण आहे त्या ज्यांची कमाई आहे आहे त्यांच्या पतीपेक्षाही जास्त.

बिपाशा बॉलीवूडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. बिपाशा बसूने २०१६ मध्ये करण सिंह ग्रोवर सोबत लग्न केले होते. बिपाशा बसू १०० करोड रुपये संपत्तीची मालकीण आहे. या तुलनेने तिचा पती कमाईच्या बाबतीत खूपच मागे आहे.

जवळपास ८० ते ९० कोटी इतकी कमाई वर्षभरात ऐश्वर्या करते. एका जाहीरातीसाछी ती ५ ते ६ कोटी इतके मानधन घेते. तर सिनेमासाठी ८ ते १० कोटींहून अधिक मानधन ती घेते. त्या तुलनेत अभिषेकची कमाईही खूप कमी आहे.

सोहा शर्मिला टागोरची मुलगी आणि अभिनेता सैफ अली खानची बहिण आहे. सोहा आज बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरीही तिच्या नावावर नवाब कुटुंबाने कोटींची संपत्ती केली आहे. त्यामुळे सोहा पती कुणाल खेमूपेक्षाही खूप श्रीमंत आहे.

बॉलिवूडची मस्तानी दीपिका आणि रणवीर सिंहने गेल्या वर्षी २०१८ मध्ये लग्न केले होते. बॉलिवूडमध्ये रणवीरआधी तिने करिअरला सुरूवात केली होती. तसेच कमाईच्या बाबतीत ती रणवीरपेक्षाही अधिक कमावते.