डबू रतनाणीच्या कलेंडरमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज, इतका तर सिनेमातही दिसत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 12:23 PM2020-02-20T12:23:36+5:302020-02-20T14:43:31+5:30

बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी दरवर्षी त्यांचे सेलिब्रिटी कॅलेंडर प्रकाशित करत असतात व नुकतेच डब्बू रत्नानीचे 2020 मधील नवीन कॅलेंडर प्रकाशित झालं आहे . यंदाच्या त्यांच्या कॅलेंडरमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो आपल्याला पाहायला मिळाले आहे.

बोल्ड, सेक्सी व अनोख्या अंदाजामुळे अनेकांना घायाळ करणा-या सनी लिओनीने देखील डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे

'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा विकी कौशलचं नवीन फोटोशूट चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

'कबीरसिंग' आणि 'गुड न्यूज' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री कियारा आडवाणीने या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केलं आहे.सध्या तिच्या या फोटोची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे

'पानिपत' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री क्रिती सेनने ऑफशोल्डर ड्रेस परिधान करुन फोटोशूट केलं.

'द डर्टी पिक्चर' या चित्रपटातून अभिनयाची वेगळी छटा दाखविणारी अभिनेत्री विद्या बालननेदेखील या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे.

बॉलीवूडचे नवाब अभिनेता सैफ अली खानने आपल्या हटके अंदाजात फोटोशूट केलं असून तो लाल रंगाच्या बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला दिसत आहे

आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री ऐश्वर्या रायने या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन.

'स्टुडंट्स ऑफ दि इयर २' या चित्रपटातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अनन्य पांडेने या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे.

'पती पत्नी ऑर वो 'मध्ये झळकणारी अभिनेत्री भूमी पेडणेकरने बाथटबमध्ये बसून फोटोशूट केलं आहे

श्रीलंकन अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने घोड्यासोबत फोटो काढला असून या फोटोत तिचा अनोखा अंदाज दिसत आहे

आपल्या डान्सने चाहत्यांना भूरळ घालणारा अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्या स्टायलिश अंदाजात या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे.

परिणीति चोप्रा