लग्नापूर्वीच अनन्या पांडेची बहीण Pregnant? घरातल्यांना बसला जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 01:25 PM2021-12-03T13:25:26+5:302021-12-03T13:33:13+5:30

Alanna panday: अलानाच्या प्रेग्नंसीविषयी समजताच सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना वेग आला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे कुटुंबीय सोशल मीडियावर कायमच चर्चेत येत असतात. कधी त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलमुळे तर कधी पर्सनल लाइफमुळे. यावेळी अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण चर्चेत आली आहे.

अनन्याप्रमाणेच तिच्या चुलत बहिणी शनाया आणि अलाना पांडे या दोघीही चर्चेत असतात. मात्र, यावेळी अलाना पांडे चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली अलाना तिच्या बोल्डफोटोशूट सोबतच लव्हलाइफमुळेही चर्चेत असते.

काही दिवसांपूर्वीच अलाना पांडेने प्रियकर आयवर मॅक्रे याच्यासोबत साखरपुडा केला. या साखरपुड्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली होती.

अलिकडेच साखरपुडा करणाऱ्या अलानाने नुकतीच तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली. ज्यामुळे सध्या अलाना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, तिच्या प्रेग्नंसीमागे एक वेगळंच कारण असल्याचं समोर आलं आहे.

'मी प्रेग्नंट आहे', असं म्हणत अलाना आणि तिच्या बॉयफ्रेंडने ही माहिती अलानाच्या कुटुंबीयांना दिली. परंतु, ही गोष्ट ऐकल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. विशेष म्हणजे तिची आई ही गोष्ट मान्यच करायला तयार नव्हती.

अलानाच्या प्रेग्नंसीविषयी समजताच सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना वेग आला. परंतु, अलाना खरंच प्रेग्नंट नसून तिने एक प्रँक केला होता.

अलाना एक प्रसिद्ध युट्यूबर असून ती असे अनेक प्रँक करत असते. असाच एक प्रँक तिने कुटुंबीयांसोबत केला.

अलाना खरंच प्रेग्नंट नसून केवळ घरातल्यांची मस्करी करावी या उद्देशाने तिने ही खोटी माहिती दिली होती. तिने हा प्रँक केला होता. मात्र, तिच्या या प्रँकमुळे काही काळ तिची आई चांगलीच चिंतेत आल्याचं पाहायला मिळालं.

अलाना खरंच प्रेग्नंट नसून केवळ घरातल्यांची मस्करी करावी या उद्देशाने तिने ही खोटी माहिती दिली होती. तिने हा प्रँक केला होता. मात्र, तिच्या या प्रँकमुळे काही काळ तिची आई चांगलीच चिंतेत आल्याचं पाहायला मिळालं.

अलानाने तिच्या प्रेग्नंसी प्रँकचा हा भन्नाट व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.

Read in English