'तिसरं लग्न करणार..'; लग्नाविषयीच्या चर्चांवर अमिरचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 01:13 PM2021-11-23T13:13:58+5:302021-11-23T13:23:55+5:30

Aamir khan: आमिर गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री फातिमा सना शेखला डेट करत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे फातिमासोबतच आमिर तिसरं लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. किरण रावला घटस्फोट दिल्यानंतर आमिर तिसरं लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. (फोटो सौजन्य: Avinash Gowariker instagram page)

आमिर गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री फातिमा सना शेखला डेट करत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे फातिमासोबतच आमिर तिसरं लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

येत्या काळात आमिर आणि फातिमा लग्न करणार असल्याचं म्हटलं जात असून आता आमिरच्या एका जवळच्या व्यक्तीने या प्रकरणी नवीन माहिती दिली आहे.

फातिमाने आमिरसोबत ‘दंगल’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटात काम केले आहे.

किरण रावसोबत घटस्फोट घेतल्यानतंर आमिर हा फातिमासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावरुन आमिरला अनेकांनी ट्रोल केले होते.

इंडिया टुडे’नुसार, आमिरच्या तलग्नाची माहिती पूर्णत: चुकीची आहे. आमिरच्या जवळच्या व्यक्तीने एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे.

“आमिर खान तिसरं लग्न करणार असल्याची माहिती पूर्णत: चुकीची आणि खोटी आहे. आमिर तिसरे लग्न करण्याच्या कोणत्याही विचारात नाही. त्यामुळे मीडियामध्ये त्यांच्याबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत, त्या पूर्णपणे निराधार आहेत,” असे स्पष्टीकरण या व्यक्तीने आमिरच्या वतीने दिलं आहे.

आमिर खानने १९८७ मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. परंतु, त्यांचा संसार फार काळ टिकला नाहीत. या जोडीने २००२ मध्ये घटस्फोट घेतला.

रिनाला घटस्फोट दिल्यानंतर आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. मात्र काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटाच्या अवघ्या काही महिन्यानंतर आमिर लवकरच तिसऱ्या विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात होतं. मात्र, ही खोटी माहिती असल्याचं समोर आलं आहे.

आमिर लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये आमिर आणि करीना कपूर खान पुन्हा एकदा दिसणार आहेत.

Read in English