बर्थडे स्पेशल : बॉलीवूडच्या सिंघम 'अजय देवगन'बद्दल या गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 04:17 PM2020-04-02T16:17:38+5:302020-04-02T16:32:18+5:30

अजय देवगन

अजय देवगनचा आज ५० वा वाढदिवस आहे.

चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काजोलनेसुद्धा पती अजयला ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अजयने 'फुल और काटे' या चित्रपटातून बॉलिवूमध्ये डेब्यु केला होता.

आपल्या अभिनयाने तो आजही बॉलिवूडवर राज्य गाजवत आहे.

अजय दिवंगत अ‍ॅक्शन डायरेक्टर वीरू देवगन यांचा मुलगा आहे.

अजय देवगनचे खरे नाव विशाल देवगन आहे

लहानपणी अजयला प्रेमाने राजू बोलायचे

'फुल और काटे' या चित्रपटासाठी अजयला सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर अॅवेर्ड मिळाला होता.

'गोलमाल', 'हम दिल दे चुके सनम' , 'सिंघम', 'गंगाजल', 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई' या चित्रपटातून अजयने तरुणांच्या मनात आपली एक वेगळीच छाप पाडली.

अजयचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला.

या चित्रपटात अजयने तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती.