विवेक ओबेरॉय एका सिनेमासाठी घेतो 3 ते 4 कोटी मानधन, आहे इतक्या कोटींचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 04:17 PM2020-09-03T16:17:05+5:302020-09-03T16:34:37+5:30

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याचा आज वाढदिवस.

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याचा आज वाढदिवस.

3 सप्टेंबर 1976 रोजी जन्मलेला विवेक आज त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करतोय.

विवेकचे वडील सुरेश ओबेरॉय बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत विवेक बॉलिवूडमध्ये आला.

जन्मानंतर विवेकचे नाव विवेकानंद ओबेरॉय ठेवण्यात आले होते. मात्र कालांतराने त्याने त्याचे नाव बदलून विवेक ओबेरॉय केले.

विवेकच्या फिल्मी करिअरमध्ये बरेच चढऊतार आलेत. त्याचे फिल्मी करिअर म्हणावे तसे यशस्वी ठरले नाही.

आजघडीला अगदी एखाद्या सिनेमात तो दिसतो. अर्थात पैशांची मात्र त्याच्याकडे कमतरता नाही.

विवेक कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक आहे. एका रिपोर्टनुसार, त्याच्याकडे 110 कोटींची संपत्ती आहे.

एका सिनेमासाठी विवेक 3 ते 4 कोटी मानधन घेतो.

अभिनेता असण्यासोबतच विवेक एका प्रॉडक्शन हाऊसचा मालक आहे.

त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव ‘ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंट’ आहे.

इतकेच नाही तर कर्म इन्फ्रास्ट्रक्चर नावाची त्याची एक कंपनी आहे. या कंपनीने 2016 मध्ये महाराष्ट्रात हाऊसिंग प्रोजेक्ट लॉन्च केला होता.

2002 मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ या सिनेमातून त्याने डेब्यू केला होता. या सिनेमासाठी त्याला बेस्ट डेब्यू आणि बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.