सारा अली खानचे बालपणीचे हे फोटो पाहाच, दिसतेय इतकी क्यूट की हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 08:00 AM2020-08-12T08:00:00+5:302020-08-12T08:00:02+5:30

अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खान हिचा आज वाढदिवस.

आज साराच्या वाढदिवशी तिचे बालपणीचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात सारा इतकी क्यूट दिसतेय की, तुम्ही तैमूरलाही विसराल.

आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने मन जिंकणारी सारा कमालीची नम्र आहे. तिच्या या नम्र स्वभावामुळे सगळीकडून तिचे कौतुक होत असते.

साराने अगदी लहानपणीचे अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न पूर्ण केले. बॉलिवूडमध्ये येण्याआधी तिचे वजन 96 किलो होते.

कॉलेजमध्ये सगळे तिला मोटी म्हणूनच चिडवायचे. पण साराने यावरही मात केली. कॉलेजच्या दुसºया वर्षाला असल्यापासून तिने वजन कमी करणे सुरु केले आणि तीन वर्षांत वजन कमी करून दाखवले.

बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधी साराचे वजन 95 किलो होते. हिरोईन होण्याच्या स्वप्नापोटी तिने आपले वजन कमी केले. अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्नही पूर्ण झाले. पण वजन कमी करणे साराला त्रासदायक ठरले आहे.

विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. होय, कमी झालेल्या वजनामुळे साराला अमेरिकेच्या विमानतळावर नेहमीच अडवले जाते. कारण काय, तर तिच्या पासपोर्टवरचा फोटो. होय, साराच्या पासपोर्टवर तिचा जुना फोटो आहे. म्हणजे, अगदी गोलमटोल असतानाचा.

केवळ फोटोच नाही तर सरनेममुळेही तिला मनस्ताप सहन करावा लागतो. कारण स्टुडंट व्हिसावर तिचे सरनेम ह्यसुल्तानह्ण आहे तर ट्रॅव्हल व्हिसावर ह्यसारा अली खानह्ण असे सरनेम आहे. यामुळे विमानतळावर तिला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते.

सारा अली खान आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. सध्या तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आहेत. साहजिकच याचे सगळे श्रेय साराची आई अमृता सिंग यांचे आहे. अमृताने साराला केवळ लहानाचे मोठे केले नाही तर तिला उत्तम संस्कारही दिलेत.

सध्या सारा कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. मात्र कालांतराने त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली होती.

साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. पाठोपाठ रणवीर सिंगसोबत ‘सिम्बा’मध्ये ती झळकली. यानंतर ‘लव आज कल 2’मध्ये ती दिसली.

लवकरच ‘कुली नंबर 1’चा रिमेक आणि ‘अतरंगी रे’ या सिनेमात ती झळकणार आहे.

‘केदारनाथ’ या सिनेमातून डेब्यू करणा-या सारा अली खानने अनेकांची मने जिंकलीत.

आज सारा बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

ऐरवी सारा अली खान ट्रॅडिशनल, सिंपल लूकमध्ये दिसते. पण गेल्या काही दिवसांत सारा कमालीची बोल्ड झालेली दिसतेय.

Read in English