खुल्लम खुल्ला प्यार करेंगे....! पाहा, फरहान अख्तर व शिबानी दांडेकरचे रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 08:00 AM2021-01-09T08:00:00+5:302021-01-09T08:00:07+5:30

फरहान अख्तरचा वाढदिवस.

बॉलिवूडचा ‘आॅल राऊंडर’ अभिनेता फरहान अख्तरचा आज (9 जानेवारी) वाढदिवस.

प्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर आणि स्क्रिप्ट रायटर हनी ईरानी यांचा मुलगा फरहान केवळ अभिनेताच नाही तर निर्माता, दिग्दर्शक, सिंगर अशीही त्याची ओळख आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी फरहानची सावत्र आई आहे. 9 जानेवारी 1974 रोजी मुंबईत फरहानचा जन्म झाला. फरहानने खूपच कमी वयात बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली आणि बघता बघता, बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.

दीर्घकाळापासून फरहान अख्तर अभिनेत्री व मॉडेल शिबानी दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

फरहान व शिबानी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. आता फरहानच्या मुलांनीही (पहिली पत्नी अधुनापासून झालेली मुलं) हे नाते मनापासून स्वीकारले आहे.

फरहान घटस्फोटीत आहे. 2017 साली त्याने पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुलं आहेत. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर काहीच महिन्यात फरहान व शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती.

खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चर्चेला तोंड फोडले होते. या फोटोत फरहान पाठमोरा होता. म्हणजे त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण हा फरहान आहे, हे ओळखायला लोकांना वेळ लागला नव्हता.

यानंतर तर होय, तो मीच, असे खुद्द फरहाननेचं जाहिर केले होते. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल आहे.