Birthday Special: वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल समंथा अक्किनेनीच्या अदा असतातच जबरदस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:15 PM2021-04-28T12:15:37+5:302021-04-28T12:25:19+5:30

समंथा अक्किनेनी दाक्षिणात्या सिनेसृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आज समंथा गणली जाते. समंथा आज आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या सौंदर्याच्याही प्रेमात चाहते पडतात. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी असतो खास.

समंथाचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्याही अधिक आहे.

वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह समंथा दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते.

शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते.

नेहमीच समंथा जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा संदेश देत असल्याचे पाहायला मिळते.

नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते.

पिवळ्या ड्रेसमध्ये तिचा हॉट अंदाज आणि घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत.

तिचे फोटो पाहून चाहते नेहमीच फिदा होतात.