रिचर्ड गेरेचा KISS ते अक्षयसोबतचे अफेअर...! या Controversariesमुळे अधिक चर्चेत राहिली शिल्पा शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 03:21 PM2020-06-08T15:21:08+5:302020-06-08T15:30:07+5:30

Controversaries ने भरलेले आहे शिल्पाचे आयुष्य

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आज 45 वर्षांची झाली आहे. 8 जून 1975 रोजी शिल्पाचा जन्म मंगळोर, कर्नाटक येथे झाला.

शिल्पाने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली. तेव्हा तिचे वय केवळ 16 वर्षे होते. 1991मध्ये तिने पहिल्यांदा लिम्का ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग केले होते.

शिल्पा आज बॉलिवूड आणि बिझनेस वर्ल्डमधील सुंदर महिला म्हणून ओळखली जाते. मात्र 90च्या दशकातील आणि 2000नंतरची छायाचित्रे तिचे दोन चेहरे दाखवतात. सांगितले जाते, की सिनेमांमध्ये यशस्वी होण्यासाठी शिल्पाने प्लास्टिक सर्जरी केली आहे. तिने एकदा नव्हे तर दोनदा प्लास्टिक सर्जरी करून आपल्या नाकाचा आकार बदलला आहे.

2007मध्ये शिल्पा शेट्टी ब्रिटीश रिअ‍ॅलिटी शो बिग ब्रदरचा भाग बनली होती. त्यावेळी रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार जेड गुडी आणि इतर लोकांनी तिच्यावर भेदभाव केल्याचा आरोप लावला होता. त्यावेळी हा विषय बराच वादग्रस्त ठरला होता. भारत आणि ब्रिटीशमध्ये यावर तिव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. शिल्पाचे रडतानाची अनेक छायाचित्रे समोर आली होती. या प्रकरणामुळे लोकांनी व्होटींग करून शिल्पाला त्या शो ची विजेती बनवले होते.

शिल्पाशी निगडीत दुसरा वाद हा 2007मध्ये घडला होता. मुंबईत आयोजित एड्स अवेअरनेस प्रोग्रामवेळी हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गेर यांनी तिला सार्वजनिक ठिकाणी किस केले होते. त्यावेळी शिल्पाला टीकेला सामोरे जावे लागले होते.

सिनेमांत एकत्र काम करत असताना अक्षय व शिल्पा दोघांमध्ये सूत जुळले होते़ शिल्पापूर्वी रवीना टंडन, पूजा बत्रा आणि ममता कुलकर्णीसोबतही त्याचे नाव जुळले होते. मात्र तरीही शिल्पा त्याच्यावर भाळली होती़ याचकाळात अक्षयचे नाव ट्विंकलसोबत जुळले. अक्षय आपल्याला दगा देतोय, हे शिल्पाच्या लक्षात आले आणि तिने त्याच्या आयुष्यातून काढता पाय घेतला.

शिल्पा शेट्टीने 22 नोव्हेंबर 2009 रोजी लंडनबेस्ड बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले. राज कुंद्रा घटस्फोटीत होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कविता होते. कविताने शिल्पावर गंभीर आरोप केला होता. शिल्पामुळेच माझा संसार मोडला, असे ती म्हणाली होती.

2003 साली शिल्पा व तिच्या संपूर्ण कुटुंबावर अंडरवर्ल्ड सोबत कनेक्शन असल्याचा आरोप लावण्यात आला. तिच्या आई-वडिलांनी हे आरोप साफ नाकारले होते़ त्यांच्या म्हणण्यानुसार, शिल्पाचे नाव खराब करण्यासाठी असे खोटे आरोप तिच्यावर लावले गेले होते.

2006 मध्ये मदुराई मधील एका कोर्टाने रीमा सेन आणि शिल्पा शेट्टीवर अश्लीलता पसरवण्याचा आरोप लावला. एका तामिळ कव्हर पेजवर शिल्पाच्या बोल्ड फोटोमुळे तिच्यावर हा आरोप लावण्यात आला. यावर शिल्पाने कोणताही बोल्ड फोटोशूट केला नसल्याचे सांगितले होते.